कृषी उत्पन्न बाजार समितीची खाती गोठवली

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 जानेवारी 2018

कऱ्हाड - दहा वर्षापासून सुमारे अडीच कोटींचा थकवलेला वेगवेगळा सेवा कर वसूल करण्यासाठी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीची नऊ वेगवेगळी खाती वस्तू व सेवा कर विभागाच्या कार्यालयाने आज गोठवली. केंद्रीय वस्तू व सेवा कर विभागाच्या सहाय्यक आयुक्त कार्यालयाने ही कारवाई केली. अडीच कोटीपैकी एक कोटी रुपये अद्यापही भरलेले नाहीत, त्यामुळे कारवाईचे पाऊल उचलण्यात आले. बाजार समितीची पैसे भरण्याची मुदत सहा महिन्यापूर्वीच संपलेली आहे. तरीही ते पैसे न भरल्याने वस्तू व सेवा कर विभागाने कारवाईचे पाऊल उचलले आहे. बाजार समितीच्या कार्यालयाला टाळे ठोकण्यासह त्यांच्या मालमत्तेवरही बोजा चढवण्याचीही कार्यवाही सुरु आहे.

कऱ्हाड - दहा वर्षापासून सुमारे अडीच कोटींचा थकवलेला वेगवेगळा सेवा कर वसूल करण्यासाठी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीची नऊ वेगवेगळी खाती वस्तू व सेवा कर विभागाच्या कार्यालयाने आज गोठवली. केंद्रीय वस्तू व सेवा कर विभागाच्या सहाय्यक आयुक्त कार्यालयाने ही कारवाई केली. अडीच कोटीपैकी एक कोटी रुपये अद्यापही भरलेले नाहीत, त्यामुळे कारवाईचे पाऊल उचलण्यात आले. बाजार समितीची पैसे भरण्याची मुदत सहा महिन्यापूर्वीच संपलेली आहे. तरीही ते पैसे न भरल्याने वस्तू व सेवा कर विभागाने कारवाईचे पाऊल उचलले आहे. बाजार समितीच्या कार्यालयाला टाळे ठोकण्यासह त्यांच्या मालमत्तेवरही बोजा चढवण्याचीही कार्यवाही सुरु आहे. कारवाईने येथे खळबळ उडाली आहे. कऱ्हाड व पाटण तालुक्यातील ही पहिलीच कारवाई आहे. 

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीकडून दहा वर्षापासूनचे वेगवेगळे सेवा कर भरणे बाकी आहे. त्याबाबत वस्तू व सेवा कर विभागाने त्यांना वारंवार स्मरण पत्रे दिली. मात्र तरिही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्या विभागातर्फे आकारण्यात येणाऱ्या वस्तू व सेवा कर मान्य नसेल तर त्याला त्यांच्याच वरिष्ठांकडे अपील दाखल करावे लागते. असे अपील दाखल केल्यास ती प्रक्रीया सुरु राहते. मात्र बाजार समितीकडून तसे कोणतेही अपील दाखल केले गेले नाही. दहा वर्षात त्यांना त्यांच्या थकीत कर भरण्याविषयी तीन वेळा तारीख सुनावणी ठेवण्यात आली. मात्र त्या सुनावणीसही ते उपस्थित राहिले नाहीत. 2007-08 पासून बाजार समितीकडून वेगवेगळे सेवा कर भरले गेले नाहीत. त्यात कृषी प्रदर्शनास स्टॉल भाड्याने देणे व त्याला वेळ देणे, बाजार समितीची जागा जाहीरातीसाठी देणे व गाळे भाड्याने देणे या तिन्हीवर आकारण्यात येणारा कर भरला गेला नाही. तो भरावा, यासाठी सातत्याने वस्तू व सेवा कर विभाग त्यांच्या मागे लागला. मात्र तो त्यांनी भरला नाही. त्यामुळे हे कारवाईचे पाऊल उचलण्यात आले. 

Web Title: marathi news Agricultural Produce Market Committee central tax department