स्वच्छतेबाबत अक्कलकोटच्या प्रभाग आठचे एक पाऊल पुढे

akkalkot
akkalkot

अक्कलकोट : अक्कलकोट शहराने स्वच्छ सर्वेक्षण २०१८ मध्ये भाग घेतला खरा पण तो संपूर्ण यशस्वी होण्यासाठी शहरातील सर्व वॉर्डनी संपूर्ण योगदान देणे गरजेचे आहे. यासाठी आता प्रभाग क्र. आठने कंबर कसली आहे. महाराष्ट्र शासनाने स्वच्छ वॉर्ड स्पर्धा जाहीर केली आहे. याला पारितोषिक देखील जाहीर केले आहे. याचा पुरेपूर उपयोग करून घेत प्रभाग आठचे नगरसेवक नसरोद्दीन मुतवल्ली आणि सारिका पुजारी यांनी नियोजनरीत्या मुख्याधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रेरणेने काम सुरू केले आहे. त्याने कालपासून वेग घेतला आहे आणि हे काम शहरातील इतर वॉर्डांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. या नगरसेवकांनी खालील कामे सुरू केली आहेत. त्यात प्रामुख्याने प्रत्येक घरात ओला व सुका कचरा वेगळा करण्यासाठी डस्टबिनचे स्वखर्चातून वाटप आणि ते घंटागाडीत देण्यास मोठ्या प्रमाणावर सुरुवात केली. 

प्लॅस्टिकला पर्याय म्हणून चांगल्या दर्जाच्या कापडी पिशव्याचे लवकरच वाटप, वॉर्डातील सर्व लहान मोठ्या गटारींची संपूर्ण स्वच्छता आणि किरकोळ दुरुस्ती करणे, वॉर्डातील प्रत्येक घरांवर स्वच्छतेचे संदेश चिकटविणे व निवेदन करणे, वॉर्डातील वीज वितरण व्यवस्थेतील त्रुटी दूर करण्यात आली, वॉर्डातील सार्वजनिक शौचालय स्वच्छता करण्यात आले आणि आता त्यावर पाण्याची टाकी आणि सतत पाण्याची सोय करण्याचे नियोजन, वॉर्डातील सर्व गटारींवरील व इतर ठिकाणी असलेली झुडुपे व काटेरी झाडे काढणे सुरू करण्यात आले आहे. वॉर्डातील सर्व मंदिर, मस्जिद व 
दर्गाह यांचा संपूर्ण परिसर आणि मुख्य भागाचा स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून स्वच्छ करण्याचे नियोजन सुरू करण्यात आले आहे. वॉर्डातील प्रत्येक गल्लीची सुरुवात जेथे होते तिथे स्वच्छ सर्वेक्षण स्वागत कमान उभारण्यात येत आहे. 

सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे या वॉर्डच्या या सर्व कामाच्या नियोजनासाठी व नियंत्रणासाठी स्वतःचे या प्रभागासाठी एक स्वतंत्र कार्यालयाची निर्मिती करण्यात आली असून त्यासाठी दोन खासगी पगारदार व्यक्तींची नेमणूक करण्यात आली आहे. याद्वारे चोवीस तास सेवा देण्यात येणार असून नागरिकांना स्वच्छता अॅप डाउनलोड करणे व ते वापरण्याचे माहिती करून दिले जाणार आहे. या सर्व कामाचे नियोजन एजाज मुतवल्ली, सुभाष पुजारी, मतीन पटेल, अस्लाम बोरोटी, असिफ जमादार, स्वप्नील आगरखेड, अल्तमश घोळसगावकर, शकील पठाण व वॉर्डातील कार्यकर्त्यांचे अमूल्य सहकार्य या कामासाठी घेतले जात आहे. 

माझ्या कार्यालयातून केबल टाकून वॉर्डात चार ठिकाणी ध्वनिक्षेपक बसवून सकाळ आणि संध्याकाळी नागरिकांना स्वच्छता संदेशाचे आवाहन करण्यात येणार असून या आठवड्यात वॉर्डात कचरा दाखवा आणि बक्षीस मिळवा ही अभिनव योजना सुरू केली जाणार आहे, असे प्रभाग आठचे नगरसेवक नसरोद्दीन मुतवल्ली यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com