अक्कलकोटला लाभार्थ्यांच्या वतीने सरकारप्रती कृतज्ञता मेळावा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 डिसेंबर 2017

अक्कलकोट : माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या वाढदिवसानिमित्त अक्कलकोट येथे सोमवारी शासकीय योजनेतील लाभार्थ्यांच्या कृतज्ञता मेळाव्याचे आयोजन भाजपचे तालुकाध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी आणि विवेकानंद प्रतिष्ठान यांनी केले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहकारमंत्री सुभाष देशमुख हे होते. मेळाव्याला मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी श्रीकांत भारतीय, राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, अनुलोमचे पश्चिम महाराष्ट्र विभाग प्रमुख चंद्रकांत पवार, भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, ज्येष्ठ नेते दत्ताअण्णा

अक्कलकोट : माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या वाढदिवसानिमित्त अक्कलकोट येथे सोमवारी शासकीय योजनेतील लाभार्थ्यांच्या कृतज्ञता मेळाव्याचे आयोजन भाजपचे तालुकाध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी आणि विवेकानंद प्रतिष्ठान यांनी केले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहकारमंत्री सुभाष देशमुख हे होते. मेळाव्याला मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी श्रीकांत भारतीय, राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, अनुलोमचे पश्चिम महाराष्ट्र विभाग प्रमुख चंद्रकांत पवार, भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, ज्येष्ठ नेते दत्ताअण्णा
 तानवडे, नगराध्यक्षा शोभा खेडगी, जिल्हा परिषदेचे पक्षनेते आनंद तानवडे, उपनगराध्यक्ष यशवंत धोंगडे, दुधनीचे नगराध्यक्ष भीमाशंकर इंगळे, डॉ. सुनील पिसके, नगरसेवक महेश हिंडोळे, महिला आघाडीच्या अध्यक्षा सुरेखाहोळीकट्टी, तालुकाध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

प्रारंभी या मेळाव्याचे दिपप्रज्वलन सहकारमंत्री देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर लाभार्थ्यांच्यावतीने सरकारचे प्रतिनिधी म्हणून सुभाष देशमुख आणि श्रीकांत भारतीय यांनी सत्कार स्वीकारला. यावेळी बोलताना सहकार मंत्री सुभाष देशमुख म्हणाले की, गेल्या पन्नास वर्षात जो विकास झाला नाही, तसा विकास सध्याचे सरकार करत असून नेहमी या सरकारने वंचितांना केंद्रस्थानी ठेवून काम केले आहे म्हणून आज खऱ्या लाभार्थ्यांना न्याय मिळाला आहे. पुढे बोलताना सहकारमंत्री देशमुख म्हणाले, गेल्या तीन वर्षात शासनाने अनेक चांगल्या योजना राबविल्या आहेत त्याचा फायदा अनेक गरजू व्यक्तींना झाला आहे त्याबद्दल कृतज्ञता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले ही बाब खरोखरच सरकार प्रति विश्वास दाखवणारी आहे. पूर्वीच्या सरकारने काम केले परंतु योजनेचा लाभ खऱ्या अर्थाने त्यांच्या पर्यंत पोचला नाही. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने ही व्यवस्था बदलण्याचे काम केले. त्याला चांगले यश मिळाले आहे त्यामध्ये जलयुक्त सारखी चांगली योजना पुढे येत आहे कर्जमाफी शेतकरी सन्मान योजना आहे जी खऱ्या अर्थाने लाभार्थ्यांपर्यंत पोचली आहे. अशा अनेक योजना आहेत ज्याचा लाभ अतिशय पारदर्शी पद्धतीने राज्यातील लाभार्थ्यांना झाला आहे. याचवेळी श्रीकांत भारतीय व पाशा पटेल यांनी आपले विचार व्यक्त केले. प्रास्ताविकात सचिन कल्याणशेट्टी यांनी सरकारचे काम कशा पद्धतीने सुरू आहे ते किती प्रभावी आहे हे सांगितले. त्याची माहिती सर्वांना व्हावी यासाठी या मेळाव्याचे आयोजन केल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते मल्लिनाथ स्वामी यांचा वाढदिवसानिमित्त मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

चंद्रकांत पवार, सुरेखा होळीकट्टी यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन 
मंगेश लामकाने यांनी केले. आभार शिवशरण जोजन यांनी मानले. तर या मेळाव्याला भाजपचे माजी तालुकाध्यक्ष मल्लिनाथ स्वामी, बसवराज तानवडे, आणप्पा बाराचारी, गुंडाप्पा पोमाजी, राजशेखर मसुती, आप्पासाहेब पाटील, मोतीराम राठोड, मल्लिनाथ कल्याणशेट्टी, प्रदीप पाटील, कांतू धनशेट्टी, बाबुराव पुकाळे, बाळा शिंदे, राजकुमार झिंगाडे, अशोक येणेगुरे यांच्यासह शहर व ग्रामीण भागातील भाजप कार्यकर्ते, लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विवेकानंद प्रतिष्ठानच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Marathi news akkalkot news program for government by beneficiary