अक्कलकोट तहसील कार्यालयासाठी दोन कोटी 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 फेब्रुवारी 2018

सोलापूर - अक्कलकोट येथील तहसील कार्यालयाच्या बांधकामासाठी दोन कोटी 19 लाख 12 हजार रुपयांना सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे या कार्यालयाचे उर्वरित काम मार्गी लागणार आहे. सुधारित प्रशासकीय मान्यतेने मिळालेल्या रकमेचा उपयोग मुख्य इमारत, विद्युतीकरण यासाठी करता येणार आहे. अक्कलकोट येथे तहसील कार्यालयाच्या इमारतीसाठी 28 फेब्रुवारी 2009 च्या शासन निर्णयान्वये एक कोटी 47 लाख 81 हजार 600 इतक्‍या रकमेच्या अंदाजपत्रकास मान्यता दिली होती. या कार्यालयाच्या बांधकामासाठी खर्चात झालेली वाढ विचारात घेऊन नव्याने दोन कोटी 19 लाख रुपयांच्या वाढीव खर्चास शासनाने मंजुरी दिली आहे.

सोलापूर - अक्कलकोट येथील तहसील कार्यालयाच्या बांधकामासाठी दोन कोटी 19 लाख 12 हजार रुपयांना सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे या कार्यालयाचे उर्वरित काम मार्गी लागणार आहे. सुधारित प्रशासकीय मान्यतेने मिळालेल्या रकमेचा उपयोग मुख्य इमारत, विद्युतीकरण यासाठी करता येणार आहे. अक्कलकोट येथे तहसील कार्यालयाच्या इमारतीसाठी 28 फेब्रुवारी 2009 च्या शासन निर्णयान्वये एक कोटी 47 लाख 81 हजार 600 इतक्‍या रकमेच्या अंदाजपत्रकास मान्यता दिली होती. या कार्यालयाच्या बांधकामासाठी खर्चात झालेली वाढ विचारात घेऊन नव्याने दोन कोटी 19 लाख रुपयांच्या वाढीव खर्चास शासनाने मंजुरी दिली आहे. याबाबतचा शासन आदेश आज महसूल विभागाने काढला आहे. 

Web Title: marathi news akkalkot tahsil office two crore