गुजरात विजयाचा औरंगाबादेत जल्लोष

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 डिसेंबर 2017

औरंगाबाद : देशाचे लक्ष लागलेल्या गुजरात निवडणुकीत भाजपला मिळालेल्या यशाचा भाजप कार्यकर्त्यांनी औरंगाबादेतील गुलमंडीवर जिलेबी, फाफडा एकमेकांना भरवत जल्लोष साजरा केला. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी फुगडी खेळत आनंदोत्सवात सहभाग नोंदवला. 

भाजपसाठी विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली होती. या पार्श्‍वभूमीवर मतदारांनी पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्‍वास दाखवत भाजपच्या हाती सत्ता दिली. या विजयाचा जल्लोष सर्वत्र सुरु असतांनाच औरंगाबादमध्ये देखील भाजपच्या कार्यकर्त्यांनी गुलमंडी येथे फटाक्‍याची आतषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला.

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर, आमदार अतुल सावे, माजी मंत्री जयसिंगराव गायकवाड, शहर-जिल्हाध्यक्ष किशनचंद तनवाणी यांच्यासह शेकडो भाजप कार्यकर्त्यांनी विजयाची नारेबाजी केली. विजया रहाटकर यांनी फुगडी घालत विजयाचा आनंद व्यक्त केला. 

Web Title: marathi news aurangabad news BJP winning celebration