रब्बीच्या कर्जवाटपातही बॅंका ढेपाळल्या 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 फेब्रुवारी 2018

सोलापूर - वार्षिक पतपुरवठा आराखड्यानुसार कर्जवाटप करण्यास जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत व व्यापारी बॅंका, जिल्हा बॅंक अपयशी ठरल्या आहेत. यंदा सोलापूर जिल्ह्यात चांगला पाऊस होऊनदेखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप व रब्बी हंगामात पीक कर्जवाटप करण्यास बॅंका असमर्थ ठरल्या आहेत. 

सोलापूर - वार्षिक पतपुरवठा आराखड्यानुसार कर्जवाटप करण्यास जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत व व्यापारी बॅंका, जिल्हा बॅंक अपयशी ठरल्या आहेत. यंदा सोलापूर जिल्ह्यात चांगला पाऊस होऊनदेखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप व रब्बी हंगामात पीक कर्जवाटप करण्यास बॅंका असमर्थ ठरल्या आहेत. 

रब्बीचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या सोलापूर जिल्ह्यात रब्बी हंगामात कर्जवाटपासाठी 2 हजार 389 कोटी रुपयांचे उद्दिष्ट बॅंकांना देण्यात आले होते. 12 फेब्रुवारीपर्यंत जिल्ह्यात फक्त 208 कोटी रुपयांचे वाटप झाले आहे. राष्ट्रीयीकृत व व्यापारी बॅंकांनी 579 कोटी रुपयांचे वाटप 31 हजार 547 जणांना केले आहे. तर, सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने 2 हजार 790 शेतकऱ्यांना 23 कोटी 11 लाख रुपये वाटून नवीन-जुन्याचा व्यवहार केला आहे. ग्रामीण बॅंकेच्या वतीने 549 जणांना 6 कोटी 69 लाख रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. 

नवीन शेतकऱ्यांना पीक कर्जवाटप करण्यात सर्वच बॅंकांनी आखडता हात घेतला आहे. जिल्हा बॅंकेने एकाही नवीन शेतकऱ्याला कर्जवाटप केले नाही. ग्रामीण बॅंकेने 12 शेतकऱ्यांना 1 कोटी 45 लाख, राष्ट्रीयीकृत बॅंकांनी 13 नवीन शेतकऱ्यांना 2 कोटी 75 लाख रुपयांचे वाटप केले आहे. जूनपासून राज्याचा सहकार विभाग व बॅंका छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत व्यग्र राहिल्या आहेत. या कर्जमाफी योजनेच्या कामात शेतकऱ्यांच्या कर्जवाटपाकडे सर्वांचेच दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे. 

आकडे बोलतात... 
एसबीआय........................................बॅंक ऑफ महाराष्ट्र 
उद्दिष्ट शेतकरी : 44880.................... 19200 
उद्दिष्ट रक्कम : 31340.00 लाख......... 27041.00 लाख 
प्रत्यक्ष लाभार्थी शेतकरी : 15003......... 601 
प्रत्यक्ष वाटप रक्कम : 21914.00 लाख ......... 1330.00 लाख 

Web Title: marathi news bank agriculture farmer