भिगवण महाविद्यालयात राज्यस्तरीय चर्चासत्र

Bhigwan
Bhigwan

भिगवण : तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी तसेच सॅम पित्रोदा यांनी भारतामध्ये डिजीटल तंत्रज्ञानाच्या युगाचा प्रारंभ झाला. एकविसाव्या शतकामध्ये डिजीटल तंत्रज्ञानाने मोठी क्रांती केली आहे. त्यामुळे माणसाचे जीवन अधिक सुखकर झाले आहे. डिजीटल तंत्रज्ञानाचे तसे फायदे आहे तसे काही दुष्परिणाही आहेत. त्यामुळे तरुणांनी डिजीटल तंत्रज्ञानाचा जबाबदारीने वापर करण्याची आवश्यकता आहे असे प्रतिपादन पुणे विदयापीठ पर्यावरणशास्त्र विभागातील डॉ. प्रवीण सप्तर्षी यांनी व्यक्त केले.  

सावित्रीबाई फुले पुणे विदयापीठ व येथील कला महाविदयालय यांचे संयुक्त विदयमाने डिजीटल टेक्नोलॉजी व अर्थसाक्षरता या विषयावरील राज्यस्तरीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. चर्चासत्राचे उदघाटन इंदापुर पंचायत समितीचे माजी सभापती रमेश जाधव यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी पुणे विद्यापीठातील भुगोलशास्त्र विभागाचे डॉ. रवींद्र जायभाय, इंदापुर अर्बन बॅंकेचे माजी अध्यक्ष अशोक शिंदे, पंचायत समिती सदस्य संजय देहाडे, संपत बंडगर, स्थानिक व्यवस्थापन समितीचे सदस्य केशव जगताप, रणजीत भोंगळे, शामराव परकाळे, संजय रायसोनी प्राचार्य भास्कर गटकुळ, प्राचार्य झा उपस्थित होते.

डॉ. सप्तर्षी पुढे म्हणाले, अर्थसाक्षरता ही कोणत्याही क्षेत्रामध्ये यशस्वी होण्यासाठी मुलभुत आवश्य बाब बनली आहे. जागतिकीकरणामुळे मोठ्या प्रमाणात स्थित्यंतरे येत आहे. जागतिकरणांमध्ये आपला शेतकरी, उदयोजक, नोकरदार अशा सर्वच घटकांना टिकायचे असे तर अर्थसाक्षरता महत्त्वाची आहे. 

रमेश जाधव म्हणाले, सर्वसामान्य माणसाच्या जीवनांमध्ये क्रांती घडवून आणण्याची क्षमता डिजीटल टेक्नॉलॉजीमध्ये आहे. तरुणांचा त्याचा योग्य कारणासाठी उपयोग करण्याची आवश्यकता आहे. एकविसावे शतक हे विज्ञानाच्या विविध आविष्काराचे शतक आहे अशावेळी अक्षर साक्षरतेबरोबर तंत्रज्ञान साक्षरता अर्थसाक्षरताही महत्वाची आहे. हे चर्चासत्र प्राध्यापक व पर्यायाने विदयार्थी यांचेमध्ये डिजीटल टेक्नॉलॉजी व अर्थसाक्षरतेचे महत्व रुजविण्यामध्ये निश्चित महत्वपुर्ण भूमीका बजावेल. यावेळी बोलताना डॉ. रवींद जायभाय म्हणाले पुणे विदयापीठाच्या चर्चासत्रांसाठी सुमारे वीस कोटी रुपयांची तरतुद केली जाते. त्याचा विद्यार्थी व प्राध्यापकांनी योग्य उपयोग करुन घेतला पाहिजे. यावेळी डॉ. रवींद जायभाय यांनी अॅप्लीकेशन व ऑफ जी.आय.एस या विषयावर, प्रा. सोमनाथ पाटील यांनी अर्थसाक्षरता या विषयावर, डॉ. भिमाजी भोर यांनी अर्थसाक्षरतेची गरज या विषयावर प्रा. दयानंद कांबळे व प्रा. तानाजी गुरगुळे यांनी ग्रंथालयामध्ये डिजीटल टेक्ऩॉलॉजीचा वापर या विषयावर आपले शोधनिबंध सादर केले. 

सत्राअध्यक्ष म्हणुन कळंब महाविदयालयाचे अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. भापकर व वरवंड महाविदयालयाचे अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. शितोळे यांनी काम पाहिले.
 प्रास्ताविक प्राचार्य भास्कर गटकुळ यांनी केले सुत्रसंचालन प्रा. शाम सातर्ले यांनी केले तर आभार प्रा. अनिल बनसोडे यांनी मानले. परिषद यशस्वी होण्यासाठी प्रा. संदीप साठे, प्रा. पदंमाकर गाडेकर, डॉ. प्रज्ञा लामतुरे, डॉ. प्रशांत चवरे, प्रा. सुरेंद्र शिरसट, प्रा. बाळासाहेब खरात, रमेश निंबाळकर, भगवान लोंढे, बाळु भिसे, गणेश जाधव, अतुल गाडे तसेच कनिष्ठ विभागातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. या चर्चासत्रामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विदयापीठ, सोलापुर विदयापीठ, कोल्हापुर विद्यापीठ आदी विदयापीठातील सुमारे 125 प्राध्यापक व संशोधक विदयार्थी सहभागी झाले. होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com