शिवजयंतीनिमित्त भिगवण येथे व्याख्यानमाला

प्रशांत चवरे
सोमवार, 12 फेब्रुवारी 2018

भिगवण : येथील अखिल भारतीय महाराठा महासंघ शाखा भिगवण संचलित छत्रपती शिवराय सावर्जनिक वाचनालयाच्या वतीने शिवजयंतीनिमित्त बुधवार दि. १४ ते रविवार दि. १८ दरम्यान येथील शिवरत्न मंगल कार्यालय येथे राजमाता जिजाऊ व्य़ाख्यानमालेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहीती शाखाध्यक्ष राजकुमार मस्कर व उपाध्यक्ष अॅड. दिलीप गिरंजे यांनी दिला आहे.

व्य़ाख्यानमालेचे उद्घाटन बुधवारी (ता.१४) सायंकाळी ६.३० वा. सातारा जलसंपदा विभागाचे अधिक्षक अभियंता विजय घोगरे व अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय सरचिटणीस राजेंद्र कोंढरे यांचे हस्ते होणार असुन अध्यक्षस्थानी सरपंच हेमाताई माडगे असणार आहेत. व्याख्यानमालेचे पहिले पुष्प सिनेअभिनेते राहुल सोलापुरकर हे प्रतापगडाचे मंत्र युध्द या विषय़ावरील वक्तृत्वाने गुंफणार आहेत. 

दुसरे पुष्प गुरुवारी (ता.१५) कोल्हापुर येथील प्रा. मधुकर पाटील हे सावधान, गावाचं गावपण हरवत चाललंय या विषयावर गुंफणार आहेत. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. रामचंद्र पवार असतील. तिसरे पुष्प शुक्रवारी(ता.१६) कोल्हापुर येथील अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजीत देशमुख हे सुजाण पालकत्व या विषय़ावर गुंफणार आहेत. अध्यक्षस्थानी पद्मश्री मणीभाई देसाई महाविदयालयाचे उपप्राचार्य आप्पासाहेब जगदाळे असतील. 

चौथे पुष्प शनिवारी (ता.१७) वारणानगर येथील डॉ. प्रिती पाटील जागर स्त्री शक्तीचा या विषयावर गुंफणार आहेत. अध्यक्षस्थानी बारामती येथील सायली अनाथ आश्रमाच्या संस्थापक झरिना खान असतील. पाचवे पुष्प रविवारी (ता.१८) अमरावती येथील अॅड. गणेश हलकारे मानवी मेंदुची गुलामगिरी या गुंफणार आहेत. अध्यक्षस्थानी पशुसंवर्धन आयुक्त विश्वास भोसले असतील. तर सोमवारी (ता.19) रोजी शिवजयंतीनिमित्त येथील छत्रपती शिवराय सावर्जनिक वाचलनालयामध्ये शिवप्रतिमेचे पूजन ठेवण्यात आले आहे.

Web Title: Marathi news bhigwan news shivaji maharaj birth anniversary