माळशेज घाटात बस अपघात

नंदकिशोर मलबारी
बुधवार, 6 डिसेंबर 2017

मुरबाड पासून 60 किमीवर असलेल्या माळशेज घाटातून अर्नाळा आगाराची प्रवासी बस कल्याणकडे जात असताना समोरून आलेल्या दुस-या बसला वाचवताना अपघातग्रस्त बसच्या वाहकाचे गाडीवरचे नियंत्रण सुटल्याने गाडी एका खड्ड्यात आपटून घाटातील कठड्याला जाऊन धडकली.

सरळगांव : कल्याण-अहमदनगर या महामार्गावरील माळशेज घाटातील एका वळणावर प्रवासी बस चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने बस, घाटातील एका कड्याला जाऊन धडकल्याने मोठा अपघात होण्यापासुन वाचला. या अपघातात कोणीही गंभीर जखमी झाले नसले तरी प्रवाशांचे नशीब बलवत्तर म्हणून हा मोठा अपघात होता होता वाचला. मुरबाड पासून 60 किमीवर असलेल्या माळशेज घाटातून अर्नाळा आगाराची प्रवासी बस कल्याणकडे जात असताना समोरून आलेल्या दुस-या बसला वाचवताना अपघातग्रस्त बसच्या वाहकाचे गाडीवरचे नियंत्रण सुटल्याने गाडी एका खड्ड्यात आपटून घाटातील कठड्याला जाऊन धडकली. या अपघातात कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती टोकावडे पोलीस ठाण्याचे पोलिस निरिक्षक पोरे यांनी दिली. 

प्रवासी वाहातुक करणारे बस चालक बेजबाबदारपणे बस चालवत असल्याचा आरोप अनेक वेळा प्रवासी करत असतात. खाजगी थांब्यावर गाडी थांबवून आरामशीर नाश्ता करून पुढील प्रवासाला निघायचे हे नित्याचे आहे. मात्र खाजगी थांब्यावर घालवलेला वेळ मात्र रस्त्यावरील खड्डे, वळणं याची पर्वा न करता बस वेळेवर पोहोचण्यासाठी बस वेगाने चालवत असल्याने समोरून आलेल्या वाहानाला वाचविण्यासाठी या अगोदर अनेक प्रवाशांचे प्राण घेतले आहेत. आजचा अपघात हाही याचेच उदाहरण आहे. अशा वाहन चालकांवर कायदेशीर कारवाई करून प्रवाशांचे प्राण वाचविण्यासाठी वरिष्ठांनी प्रयत्न करावे अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.   
 

Web Title: Marathi news bus accident at malshej ghat