कऱ्हाड; कचऱ्यामुळे नागरीक हैराण

marathi news cleanliness survey garbage plastic municipal corporation
marathi news cleanliness survey garbage plastic municipal corporation

कऱ्हाड - स्वच्छ सर्वेक्षणातंर्गत शहरातील कचरा कोंडाळी गायब झाली. तेथे स्वच्छताही आली. रांगोळ्या रेखाटल्या जावू लागल्या. पालिकेतर्फे घरोघरी बकेट वाटपही केले जाणार आहे. शहरात स्वच्छतेसाठी अनेक संस्था, लोक पुढे येत आहेत. मात्र व्यापाऱ्यांकडून टाकल्या जाणाऱ्या कचऱ्यांवर अद्याप काहीच उपाय शोधला गेलेला नाही. त्या कचऱ्यामुळे स्वच्छ असलेल्या नागरी वसाहती अस्वच्छ होत असून त्या कचऱ्यामुळे नागरीकांनाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे. मोठ्या शोरुम किंवा मोठ्या व्यापाऱ्यांच्या येणाऱ्या मोठाल्या पार्सलमधून येणारे थर्माकॉल, प्लास्टिक कागद व पुठ्ठ्याची विल्हेवाट लावण्याबाबत काहीच जागरुकता झालेली नाही. अनेकदा ते सारे साहित्य व्यापारी रात्री उशिरा एखाद्या कोपऱ्यात टाकतात किंवा ते सरळ गटारीत टाकले जाते. व्यापाऱ्यांकडून टाकल्या गेलेल्या प्लास्टिकमुळे अनेक ठिकाणची गटारे तुंबली आहेत. तर थर्माकॉलही कोंडाळे नसलेल्या ठिकाणी ढिग लावून टाकलेला दिसतो. 

पालिकेने संबधित व्यापाऱ्यांना थेट नोटीसा काढून कारवाईचे आदेश देण्याची गरज आहे. शहरात स्वच्छ सर्वेक्षणातंर्गत चांगले काम झाले. सलग तीन दिवस पाहणी झाली. त्यासाठी पालिकेने जय्यत तयारीही केली होती. त्या निमित्ताने पालिकेत सारेच एकत्र आल्याचेही पहावयास मिळाले. सर्वेक्षणातंर्गत शहरातील बहुतांशी ठिकाणची कोंडाळी काढून टाकण्यात आली. तेथे फलक लावून कायदेशीर कारवाईचा इशारा पालिकेने दिला. अनेक भागात घंटागाडी सुरु करण्यात आली. शहरातील घरांमध्ये बकेट वाटण्यात येणार आहेत. मात्र मोठी कोंडाळी गायब करुन पालिकेने त्या ठिकाणी सुरु केलेल्या घंटा गाडीमुळे कचरा देतानाच वेगवेगळ्या स्वरुपात देण्याचे आवाहन नागरीकांना पालिकेने केले आहे. अनेक भागात अद्याप पालिकेने बकेट वाटलेल्या नाहीत. त्यामुळे तेथील कचरा तसा स्विकारला जातो आहे. अनेक ठिकाणी कोंडाळी काढून टाकल्याने दोन वेळा घंटा गाडी सुरु करण्याचे नियोजन केले आहे. नागरीकांना सवय लागेपर्यंत पालिका त्याचे टाईमटेबल सुरळीत करण्याच्या प्रयत्नात आहे. त्याला नागरीकांनाही चांगली साथ दिली आहे. नागरीकांनी अनेक ठिकाणी कचरा टाकण्याचे बंद केले आहे. कोंडाळी उचलून नेल्याने सतत घाणीच्या साम्राज्यात असलेला शहरातील अनेक परिसर स्वच्छ दिसू लागला आहे. त्यात पालिका व नागरीक यांच्या समन्वयातून चांगले यश आले आहे. मात्र व्यापाऱ्यांच्या कचऱ्याचा प्रश्न अद्यापही शहरातील स्वच्छतेला बाधा ठरताना दिसतो आहे. त्याकडे पालिका व आरोग्य विभागाने लक्ष देण्याची गरज आहे. या सर्व परिस्थितीवर येथील आरोग्य सभापती प्रियांका यादव यांनी, 'व्यापाऱ्यांच्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी पालिका आरोग्य विभाग योग्य ती काळजी घेत आहे. त्यांच्यासाठी दोन वेळा व रात्री एकदा ट्रॅक्टर फिरवण्यात येणार आहे. त्यातूनही तो कचरा त्या गाडीत न टाकणाऱ्यांना नोटीस बजावण्यात येणार आहे. त्यानंतर संबधितांवर कायदेशीर कारवाईचे पाऊल उचलले जाईल, त्यासाठीही पालिका तत्पर आहे.' असे मत व्यक्त केले.  

शहरातील मुख्य बाजारपेठेत मोठी शोरुम आहेत. अनेक मोठे व्यापारी आहेत. त्यांचा माल येताना मोठी पार्सल येतात. ती पार्सल पॅक करण्यासाठी कंपन्या मोठ्या प्रमाणात प्लास्टिकसह थर्माकॉलचा वापर करतात. त्याशिवाय मोठ्या वस्तू पॅकींगसाठी मोठ्या पुठ्यांचाही वापर कंपन्या करत असतात. कंपनीतून थेट संबधित व्यापाऱ्यापर्यंत डिलीव्हर होताना मालास कोणतीही इजा होवू नये, यासाठी कंपन्या काळजी घेतात. व्यापाऱ्यांकडे तो माल आला की, ते पॅकींग बॉक्स फोडतात. वस्तूची खात्री करतात. त्यावेळी कंपनीने वापरलेला थर्माकॉलसह प्लास्टिक कागद व कागदी पुठ्ठे संबधित व्यापारी शोरुममध्ये दिवसभर ठेवतात. त्यांच्याकडे त्याची विल्हेवाट लावण्याची कोणतीही पर्यायी व्यवस्था नाही. त्यानंतर दिवसभर ठेवलेले प्लास्टिकसह संबधित कचरा रात्री उशिरा ते व्यापारी मोठ्या गाडीत भरुन थेट नदी कडेला टाकताना दिसतात. काही व्यापारी त्यांचा कचार पुलावरुन थेट नदीत टाकतात. अनेक व्यापारी रात्री उशिरा नागरी वस्तीतून पालिकेने हटवलेल्या कोंडाळ्याच्या ठिकाणी एका पिशवीत पॅक करुन असा कचरा टाकतात. पर्यायाने व्यापाऱ्यांच्या कचऱ्यामुळे पालिका व नागरीकांनी राबवलेल्या स्वच्छतेलाच थेट बाधा पोचत आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाईची निर्णय पालिकेने घेतला आहे. त्याची अमंलबजावणी उद्यापासून होण्याची शक्यता आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com