तोतया परीक्षार्थीप्रकरणी आरफळच्या दोघांवर गुन्हा 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 मार्च 2018

सातारा - वडूथ (ता. सातारा) येथील परीक्षा केंद्रात दहावीच्या मराठी विषयाच्या पेपरसाठी तोतया परीक्षार्थी बसविला. याप्रकरणी आरफळ (ता. सातारा) येथील दोघांवर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे. 

सातारा - वडूथ (ता. सातारा) येथील परीक्षा केंद्रात दहावीच्या मराठी विषयाच्या पेपरसाठी तोतया परीक्षार्थी बसविला. याप्रकरणी आरफळ (ता. सातारा) येथील दोघांवर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे. 

शुभम तुकाराम पवार, जगन्नाथ परबती पवार (रा. आरफळ, ता. सातारा) अशी त्यांची नावे आहेत. याबाबत विठ्ठल रंगराव गुजले (रा. दौलतनगर, करंजे) यांनी फिर्याद दिली आहे. वडूथ परिसरातील विद्यार्थ्यांसाठी वडूथ हायस्कूलमध्ये परीक्षा केंद्र आहे. काल मराठीचा पेपर होता. तेथे गुजले यांची नेमणूक होती. पेपर सुरू असताना त्यांनी रिसीट व ओळखपत्र तपासण्यास सुरवात केली. त्या वेळी गणेश पवार या विद्यार्थ्याच्या नावावर तोतया विद्यार्थी पेपर लिहित असल्याचे निदर्शनास आले. गुजले यांनी त्याला पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेत चौकशी केली. त्यानंतर दोघांवर गुन्हा दाखल झाला. 

Web Title: marathi news crime satara