जिल्हा न्यायालयात बंदी कैद्याने घातला गोंधळ 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 जानेवारी 2018

सोलापूर - जिल्हा कारागृहातील न्यायाधीन बंदी असलेल्याने येरवडा कारागृहात नेण्यास विरोध करुन अधिक्षक संजय कुलकर्णी यांच्याशी हुज्जत घातली. कारागृह कर्मचारी राकेश पवार यांना धक्काबुक्की करुन तुला बघून घेतो, असे म्हणून शिवीगाळ केली. 

सोलापूर - जिल्हा कारागृहातील न्यायाधीन बंदी असलेल्याने येरवडा कारागृहात नेण्यास विरोध करुन अधिक्षक संजय कुलकर्णी यांच्याशी हुज्जत घातली. कारागृह कर्मचारी राकेश पवार यांना धक्काबुक्की करुन तुला बघून घेतो, असे म्हणून शिवीगाळ केली. 

सचिन उत्तम महाजन (वय 30, रा. माळशिरस) असे गोंधळ घातलेल्या बंदीचे नाव आहे. त्याला 4 जानेवारी ला माळशिरस येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश यांच्या न्यायालयात हजर करण्यासाठी कारागृहाबाहेर काढले. प्रवेशद्वारावर आणल्यानंतर त्याने कारागृह अधिक्षक संजय कुलकर्णी यांना भेटण्याची परवानगी मागितली. अधिक्षकांकडे नेल्यानंतर त्याने मला जर तुम्ही येरवडा येथे पाठवत असाल तर मी माळशिरस येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश कारागृहात येईपर्यंत येथून हलणार नाही, असे म्हणून वाद घातला. मला कोणी हात लावला तर मी अधिक्षकांना मारहाण करेन असेही तो म्हणाला. त्यावर अधिक्षकांनी महाजन यास माळशिरस सबजेलमध्ये वर्ग करण्याचा अहवाल दाखविला. महाजन याने तो अहवाल वाचून फाडून टाकला. मी तुझे पाठवलेले पत्र रद्द करतो, असे अधिक्षकांनी महाजन यास सांगितले. तरी देखील तो ऐकत नव्हता. 

अधिक्षक यांनी त्याला कार्यालयातून बाहेर घेऊन जाण्यासाठी सौम्य बळाचा वापर केला. तो अधीक्षक कुलकर्णी यांच्या अंगावर धावून गेला. कर्मचारी राकेश पवार यांनी बंदी महाजन यास पकडून बाहेर काढले. तेव्हा त्याने पवार यांना धक्‍काबुक्की करुन शर्टाची कॉलर पकडली. तुला बघून घेतो, असे म्हणून शिवीगाळ केली. याप्रकरणी महाजनवर शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

Web Title: marathi news district court PRISONER