राज्यातील 104 डॉक्‍टरांच्या नियुक्‍त्या रद्द 

शीतलकुमार कांबळे
बुधवार, 28 फेब्रुवारी 2018

सोलापूर - महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे राज्याच्या विविध ठिकाणी वैद्यकीय अधिकारी गट-अ या पदावर डॉक्‍टरांची नियुक्ती करण्यात आली होती. यातील 104 डॉक्‍टर हे पदावर रुजू न झाल्याने त्यांची नियुक्‍ती रद्द करण्यात आली. 

ग्रामीण भागात डॉक्‍टरांची कमतरता असल्याने आरोग्य विभागातर्फे स्वतंत्र नियंत्रण मंडळ स्थापन करून समुपदेशनाद्वारे डॉक्‍टरांच्या नेमणुका करण्यात आल्या. या नेमणुका करताना डॉक्‍टरांच्या आवडीनुसार सेवा देण्याचे स्थळ निश्‍चित करण्यात आले होते. तरीही 104 डॉक्‍टर रुजू झाले नाहीत. यामुळे आरोग्य विभागातर्फे 104 डॉक्‍टरांची नियुक्ती रद्द केली आहे. 

ग्रामीण भागात सेवा देण्यासाठी डॉक्‍टर तयार होत नाहीत. यामुळे रुग्णसेवा कोलमडली आहे. हे थांबविण्यासाठी शासनाकडून वेळोवेळी उपाय करण्यात येत असतात. चार व पाच डिसेंबर 2017 मध्ये करण्यात आलेल्या नेमणुका या डॉक्‍टरांच्या मर्जीनुसार त्यांच्या आवडत्या ठिकाणी करण्यात आल्या होत्या. तरीही डॉक्‍टरांचे रुजू होण्याचे प्रमाण कमी आहे. ग्रामीण भागात प्रामुख्याने सुविधांचा असणारा अभाव हे यामागील प्रमुख कारण असल्याचे स्पष्ट होत आहे. 

का टाळतात डॉक्‍टर ग्रामीण भाग? 
एमबीबीएस झाल्यानंतर स्पेशालिटी व सुपर स्पेशालिटीचे शिक्षण घेण्याकडे डॉक्‍टरांचा कल असतो. ग्रामीण भागात राहून अशा प्रकारचे शिक्षण घेता येत नसल्याने डॉक्‍टर गैरहजर राहतात. यासोबतच शहरात खासगी प्रॅक्‍टिस करून चांगले उत्पन्न मिळत असल्याच्या कारणाने ग्रामीण भागात काम करण्याचे डॉक्‍टरांकडून टाळले जाते. 

Web Title: marathi news doctor solapur