डॉ. योगेश गुर्जर यांनी घेतली आण्णा हजारेंची भेट

मार्तंडराव बुचुडे
शनिवार, 30 डिसेंबर 2017

राळेगणसिद्धी (नगर) : प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ कै. नितू मांडके यांच्या समवेत सुमारे तीन हजारावर हृदय शस्त्रक्रीया करणारे डॉ. योगेश गुर्जर व त्यांच्या पत्नी डॉ. मानिनी गुर्जर यांनी सहकुटुंब जेष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांची सदिच्छा भेट घेतली यावेळी त्यांनी प्रदुषण नियंत्रण, हृदय रोग व त्या संबधी घ्यावयाची काळजी तसेच त्यांचे सुरू असलेले भ्रष्टाचाराच्या गुणसूत्राबाबत संशोधन या विषयी सखोल चर्चा केली.     डॉ. गुर्जर यांच्या समावेत या वेळी त्यांच्या पत्नी डॉ.

राळेगणसिद्धी (नगर) : प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ कै. नितू मांडके यांच्या समवेत सुमारे तीन हजारावर हृदय शस्त्रक्रीया करणारे डॉ. योगेश गुर्जर व त्यांच्या पत्नी डॉ. मानिनी गुर्जर यांनी सहकुटुंब जेष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांची सदिच्छा भेट घेतली यावेळी त्यांनी प्रदुषण नियंत्रण, हृदय रोग व त्या संबधी घ्यावयाची काळजी तसेच त्यांचे सुरू असलेले भ्रष्टाचाराच्या गुणसूत्राबाबत संशोधन या विषयी सखोल चर्चा केली.     डॉ. गुर्जर यांच्या समावेत या वेळी त्यांच्या पत्नी डॉ. मानिनी, संदीप देवकर, मृगा गुर्जर, स्नेहलता देवकर, स्मृती देवकर, विध्या खेर, शंतुन गुर्जर, वैष्णवी गुर्जर, भैरवी उद्योग समुहाचे दशरथ बोरूडे, दत्ता आवारी, दत्ता शेरकर आदी मान्यवर उपस्थित होते. प्रदुषण नियंत्रण व तरूण पिढीचा सामाजिक कार्य़ात सहभाग कसा वाढवता येईल त्यासाठी काय उपाययोजना कराव्या लागतील यावर हजारे यांच्या बरोबर सखोल चर्चा झाली. तसेच हृदय रोगासंबंधी लोकांनी घ्यावयाची काळजी या विषयी त्यांनी डॉ. गुर्जर यांनी माहीती दिली. त्या संबंधीच्या माहीतीची त्यांनी दोन तासाची फिल्म तयार केली आहे. ही फिल्म ते लोकांना माहीतीसह मोफत दाखवत आहेत. डॉ. गुर्जर यांनी ग्रामीण भागासाठी वेळ देऊन या रोगांसंबधीची माहीती व फिल्म मोफत दाखविण्याचेही या वेळी मान्य केले. त्याच बरोबर डॉ. गुर्जर सध्या भ्रष्टाचार च्या गुणसुत्रांवर संशोधन करत आहेत. त्यावर शास्त्रोक्त पद्धतीने उपचार कसे करता येतील या विषयी त्यांचे संशोधन सुरू आहे. या विषयीही त्यांनी हजारे यांना सखोल माहीती दिली. या पाहुण्यांनी प्रथम राळेगणसिद्धी येथील माहीती केंद्र तसेच परीसरातील विविध विकास कामांचीही पहाणी केली. 

 

Web Title: Marathi news dr yogesh gurjar meets anna hajare