ढेबेवाडी-तळमावले परिसर भूकंपाने हादरला

जयभिम कांबळे
मंगळवार, 16 जानेवारी 2018

तळमावले : आज दुपारी ठीक 1 वाजून 5 मिनीटाच्या दरम्यान झालेल्या भूकंपामुळे ढेबेवाडी-तळमावलेसह संपूर्ण पाटण तालुका भूकंपामुळे हादरला. अचानक आलेल्या भूकंपामुळे लोक घरातून सैरावैरा बाहेर पडली. भूकंप इतका तीव्र होता की घरातील साहित्य त्याचबरोबर घरांच्या भिंती हलत होत्या. सुमारे 10 सेकंद हा भूकंप जाणवला. ढेबेवाडी-तळमावले परिसर हा अंत्यत रहदारीचा आहे. त्यात ढेबेवाडी गावचा आठवडा बाजार असल्यामुळे लोकांची तेथे गर्दी होती. भूकंप आल्यामुळे बाजार परिसरातील घरातील लोक बाहेर पडल्याचे दिसताच बाजारातील लोकांचीही चांगलीच तारांबळ उडाली.

तळमावले : आज दुपारी ठीक 1 वाजून 5 मिनीटाच्या दरम्यान झालेल्या भूकंपामुळे ढेबेवाडी-तळमावलेसह संपूर्ण पाटण तालुका भूकंपामुळे हादरला. अचानक आलेल्या भूकंपामुळे लोक घरातून सैरावैरा बाहेर पडली. भूकंप इतका तीव्र होता की घरातील साहित्य त्याचबरोबर घरांच्या भिंती हलत होत्या. सुमारे 10 सेकंद हा भूकंप जाणवला. ढेबेवाडी-तळमावले परिसर हा अंत्यत रहदारीचा आहे. त्यात ढेबेवाडी गावचा आठवडा बाजार असल्यामुळे लोकांची तेथे गर्दी होती. भूकंप आल्यामुळे बाजार परिसरातील घरातील लोक बाहेर पडल्याचे दिसताच बाजारातील लोकांचीही चांगलीच तारांबळ उडाली. कोयना परिसरात भूकंप हे नेहमी येतच असतात त्यात आलेला हा भूकंप आज लोकांच्या चर्चेचा विषय ठरला आहे.

Web Title: Marathi news earthquake near koyana

टॅग्स