ऊसतोड कामगार मुलांच्या शालेय जीवनात आशेचा किरण 

कुलभूषण विभूते
बुधवार, 7 मार्च 2018

वैराग - कासारवाडी (ता. बार्शी) शिवारात आलेल्या ऊसतोड कामगारांच्या 24 मुलांच्या आयुष्यातील शालेय जीवनात आशेचा किरण निर्माण केला. बार्शी पंचायत समिती शिक्षण विभागातर्फे त्यांचा शालेय प्रवास सुरू झाला असून, पालाशेजारील एका झाडाखाली या मुलांसाठी गटशिक्षणाधिकारी विष्णू कांबळे यांनी शाळाच सुरू केली आहे. 

सध्या दहावी व बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. तालुक्‍यात या परीक्षा पार पाडण्याची जबाबदारी शिक्षण विभागाचे गटशिक्षणाधिकारी विष्णू कांबळे यांच्यावर आहे. या परीक्षेच्या धावपळीत प्रवास करताना त्यांना कासारवाडी (ता. बार्शी) शिवारात 30ते 35 कुटुंबे दिसली. या कुटुंबांत 6 ते 14 वयोगटातील तब्बल 24 मुले दिसली. आपल्या विभागाच्या सहकार्यासमवेत जाऊन त्या मुलांसोबत चर्चा केली असता, ती अप्रगत असल्याचे जाणवले. त्या 24 मुलांपैकी चार मुले कासारवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दाखल करून घेतली; तर उर्वरित 20 मुलांसाठी ऊसतोड कामगारांच्या पालाशेजारील झाडाखालीच शाळा सुरू केली. विषयतज्ज्ञ विठ्ठल गवळी, ज्ञानरचनावादी अध्यापक लक्ष्मी तोरड, अविनाश गोरे, अतुल बोराडे यांनी पालक व मुलांशी गप्पागोष्टी करत त्यांची मने जिंकली. चर्चेला सुरवात झाली अन्‌ त्यांच्या जीवनातील अप्रगतचा अंधार दीपमान झाला. निसर्गात सान्निध्यात मुलांना आधुनिक शैक्षणिक व्हिडिओ, मोबाईलवरील गाणे, गोष्टी शिकविणे सुरू झाले. छोट्या-छोट्या गोष्टी सांगितल्या, धूळपाटीवर अंकज्ञानाची ओळख करून दिली. 24 मुलांना सकाळी आठ वाजता पाटी-पेन्सिल व शालेय साहित्याचे वाटप केले. शिवाय त्यांना शालेय पोषण आहाराची खिचडी, नव्या मित्रांशी ओळख व मैत्रीने त्यांच्या जीवनातील आनंद अधिकच बहरला. 

Web Title: marathi news education Sugarcane workers children school life