युवतीची फेसबुकवर बदनामी करणाऱ्यावर गुन्हा 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 मार्च 2018

सातारा - येथील एका युवतीच्या नावाचे बनावट फेसबुक अकाउंट सुरू करून तिच्या भावी पतीला चुकीची माहिती दिली. याप्रकरणी एकावर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अवधूत तानाजी पाटील (रा. कबनूर, ता. इचलकरंजी) असे त्याचे नाव आहे. 

याबाबत एका युवतीने फिर्याद दिली आहे. नुकताच तिचा विवाह एका युवकाशी निश्‍चित केला होता. याची माहिती पाटील याला मिळाली. त्यानंतर त्याने युवतीच्या नावाने बनावट फेसबुक अकाउंट तयार केले. त्यावरून युवतीच्या भावी पतीस चुकीची माहिती देणारे संदेश पाठविण्यास सुरवात केली. त्याची माहिती त्या मुलाने युवतीच्या नातेवाइकांना दिली. त्यामुळे युवती व तिचे कुटुंबीय चक्रावले. बनावट फेसबुक अकाउंटच्या साह्याने हा प्रकार केल्याचे निदर्शनास आल्यावर त्यांनी याबाबत शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. तपासात अवधूत पाटील हे मेसेज पाठवत असल्याचे समोर आले. त्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल केला. पोलिस निरीक्षक चंद्रकांत बेदरे तपास करत आहेत.

Web Title: marathi news facebook social media satara crime