रानडुक्करांचा हैदोस

अरुण गुरव
बुधवार, 7 मार्च 2018

चांदोली अभयारण्याला लागून अती दुर्गम भागात मोरगिरी हे गाव वसले आहे. त्यामुळे ग्रामस्थांना मदतकार्य मिळवताना अनेक अडचणीचा सामाना करावा लागतो. 

मोरगिरी (ता. पाटण, जि. सातारा) - तालुक्यातील दुर्गम पांढरे पाणी येथे रानडुक्कराने केलेल्या हल्यात सावळाबाई कोंडिबा शिंदे या महिला गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर खाजगी रूग्णालयाच उपचार सुरू आहेत. काल मंगळवारी सकाळी 11 वाजता सावळाबाई शिंदे या घराच्या शेजारी शेळ्या चारात असताना रानडुक्कराच्या कळपाने त्यांच्यावर हल्ला केला. त्यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांचा आरडाओरड ऐकून ग्रामस्थ त्याठिकाणी पोहचले. त्यांनी जखमी सावळाबाई शिंदे यांना घेवून खाजगी वाहनाने आणून त्यांना दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. त्यांच्यावर खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. चांदोली अभयारण्याला लागून अती दुर्गम भागात हे गाव वसले आहे. त्यामुळे ग्रामस्थांना मदतकार्य मिळवताना अनेक अडचणीचा सामाना करावा लागतो.

Web Title: marathi news forest pig attack woman injured hospital village