पुन्हा एकजण नोकरीच्या आमिषाचा बळी!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 जानेवारी 2018

कऱ्हाड - शासकीय सेवेत नोकरी लावतो, असे लांगून धोंडेवाडी येथील युवकास नोकरीच्या आमिषाने 5 लाख 30 हजारांना गंडा घातला. या प्रकरणाची तक्रार पोलिसात काल रात्री उशिरा दाखल झाली. त्यानुसार मलकापूर (ता. कऱ्हाड) येथील सिद्धनाथ कन्सलटन्सीचे अनिल दत्तात्रय कचरे यांच्यावर गुन्हा नोंद झाला आहे. सागर संभाजी ताटे (वय 28, रा. धोंडेवाडी) असे फिर्याद देणाऱ्याचे नाव आहे. 

कऱ्हाड - शासकीय सेवेत नोकरी लावतो, असे लांगून धोंडेवाडी येथील युवकास नोकरीच्या आमिषाने 5 लाख 30 हजारांना गंडा घातला. या प्रकरणाची तक्रार पोलिसात काल रात्री उशिरा दाखल झाली. त्यानुसार मलकापूर (ता. कऱ्हाड) येथील सिद्धनाथ कन्सलटन्सीचे अनिल दत्तात्रय कचरे यांच्यावर गुन्हा नोंद झाला आहे. सागर संभाजी ताटे (वय 28, रा. धोंडेवाडी) असे फिर्याद देणाऱ्याचे नाव आहे. 

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, धोंडेवाडी येथील सागर ताटेने नोकरी विषयक जाहिरात वाचून कुटूंबियासह सिद्धनाथ कन्सलटन्सीचे अनिल कचरेची भेट घेतली. त्यावेळी कचरेने जीएसटी भवन येथे नोकरी लावतो. मात्र, लिपिक पदावर नोकरीसाठी 10 लाख रुपये व टायपिंगचे बनावट प्रमाणपत्र तयार करण्यासाठी 30 हजार रुपये असे एकूण 10 लाख 30 हजार रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. ताटे कुटुंबियांशी झालेल्या चर्चेनंतर त्यांनी 7 लाख 30 हजार देण्याचे ठरवले. त्यानुसार 20 ऑक्टोबर 2017 ला ताटे कुटुंबियांनी अनिल कचरे याला आगाऊ रक्कम 3 लाख रुपये दिलेत.

त्यानंतर दुसर्‍याच दिवशी मुंबई येथे सागर ताटे याची मुलाखत झाली. सागरकडून कचरे याच्या माध्यमातून अमित पाटील (रा. अमरावती) याने टायपिंग प्रमाणपत्रासाठी 30 हजार रुपये मुंबई येथे घेतले. त्यानंतर कचरे याने सागर यास तुझे काम झाले आहे. 2 लाख रुपये जमा कर तुला आज ऑर्डर देतो, असे सांगितले. त्यानुसार सागर याच्या वतीने त्याचा नातेवाईक देवानंद हुलवान यांनी 26 ऑक्टोबर 2017 रोजी अनिल कचरे याच्याकडे 2 लाख रुपये जमा केले. त्यानंतर सागर मुंबई येथील सीएसटी रेल्वे स्टेशनवर असतानाच एकाने त्याला महाराष्ट्र शासनाचा लोगो असलेले विक्रीकर विभागाचे लिपिक पदावरील नेमणूक पत्र दिले. मात्र, हे पत्र बनावट असल्याचे सागर याच्या निदर्शनास आले म्हणून त्यांने पत्र देणार्‍याकडे चौकशी केली. त्यावर सविस्तर माहितीसाठी अनिल कचरेला भेटा असे त्याने सांगितले. त्यानुसार दुसर्‍याच दिवशी सागर व त्याचे कुटुंबीय कचरेला भेटले. त्यावेळी नेमणूक पत्र बनावट असल्याचे निदर्शनास आणून देताच कचरे यांनी सागर याच्याशी वाद घातला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने पैसे परत मागितले असता कचरे याने तुझे पैस परत देत नाही. तुला काय करायचे आहे ते कर, असा सागर याला दम दिला. अशा आशयाची तक्रार सागर ताटे याने कऱ्हाड शहर पोलिस ठाण्यात दिली आहे. यावरून अनिल कचरेवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Web Title: marathi news fraud Job bait