झाडे तोडल्याने रिक्षा चालक संतापले

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 जानेवारी 2018

कऱ्हाड - येथील कोल्हापूर नाका परिसरातील ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण प्रवेशद्वार आहे. त्या नजीकचे पिंपळ आणि वडाचे झाड तोडल्याने लोकशाही आघाडीचे गटनेते सौरभ पाटील, पर्यावरणप्रेमी रोहन भाटे, नाना खामकर, तेथील रिक्षा चालकांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. त्या झाडांची जोपासना तेथील रिक्षा व्यावसायिक करतात. पालिकेने ती झाडं विना नोटीस पाडल्याने त्यांनीही पालिकेच्या कारभाराबाबत संताप व्यक्त केला. सगळ्यांनीच वृक्ष तोडीबाबत पालिका अधिकाऱ्यांना धारेवर धरले. ते निरुत्तर झाले होते.

कऱ्हाड - येथील कोल्हापूर नाका परिसरातील ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण प्रवेशद्वार आहे. त्या नजीकचे पिंपळ आणि वडाचे झाड तोडल्याने लोकशाही आघाडीचे गटनेते सौरभ पाटील, पर्यावरणप्रेमी रोहन भाटे, नाना खामकर, तेथील रिक्षा चालकांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. त्या झाडांची जोपासना तेथील रिक्षा व्यावसायिक करतात. पालिकेने ती झाडं विना नोटीस पाडल्याने त्यांनीही पालिकेच्या कारभाराबाबत संताप व्यक्त केला. सगळ्यांनीच वृक्ष तोडीबाबत पालिका अधिकाऱ्यांना धारेवर धरले. ते निरुत्तर झाले होते. पालिकेने वृक्ष प्राधिकरणाची स्थापना केली आहे.  त्यातील सर्व सदस्यांना विश्वासात न घेता अधिकाऱ्यांनी सकाळी सातच्या सुमारास झाडे काढली. त्याला कार्योत्तर मंजुरी घेणार असल्याचे पालिका अधिकाऱ्याने सांगितवले. त्यावेळी सौरभ पाटील यांच्यासह रिक्षा व्यावसायिकांनी संताप व्यक्त केला.

Web Title: marathi news illegal trees cutting