शास्त्रीय संगीतात जगाला शिकवण देण्याची ताकद - जॉर्ज ब्रुक्स

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 मार्च 2018

लोणी काळभोर - लोणी काळभोर येथील एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलाजी विद्यापीठाच्या विश्वशांती संगीत कला अकादमीतर्फे आयोजित संगीत कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहून म्हणून जॉर्ज ब्रुक्स उपस्थित होते. यावेळी बोलताना गायन, वादन आणि नृत्य या तीनही कलांचा संगम होवून संगीत कला निर्माण झाली आहे. तसेच या कलेचा उगम भारतात झाल्याने भारत देश संगीत कलेची जननी आहे, असे मत आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संगीतकार जॉर्ज ब्रुक्स मांडले.

यावेळी एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या कार्यकारी संचालिका ज्योती ढाकणे, विश्वशांती संगीत कला अकादमीचे सचिव आदिनाथ मंगेशकर, विश्वशांती संगीत कला अकादमीचे प्राचार्य डॉ. मिलिंद ढोबळे, कथ्थक नृत्यांगणा रुजूता सोमण उपस्थित होत्या. 

यावेळी जॉर्ज ब्रुक्स म्हणाले, "भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये जगाला शिकवण देण्याची ताकद आहे. या कलेने जगातील अनेक संगीतकार घडवले. संगीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी या कलेची पुजा केली पाहिजे. संगीत अशी कला आहे, जी सगळ्यांना जगण्याची कला शिकवते असे ते म्हणाले. 

आपल्या संगीताच्या आवडीविषयी बोलताना ब्रुक्स म्हणाले, ''पाश्चात्य संगीत कलेचे शिक्षण घेताना मला भारतीय शास्त्रीय संगीताच आवड निर्माण झाली. यामुळे भारतात आल्यानंतर पंडीत प्राणनाथ यांच्याकडून शास्त्रीय संगीताचे धडे घेतले. शास्त्रीय संगीतामुळे मला संगीत क्षेत्रातील दिग्गजांसोबत कला सादर करण्याची संधी मिळाली. यामुळे केवळ भारतीय शास्त्रीय संगीतामुळे मी प्रगती करू शकलो." संगीताबरोबर विद्यार्थ्यांनी त्यांच्या अंगी असलेल्या अन्य कला जोपासून, त्या वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत असा सल्ला देखील जॉर्ज ब्रुक्स यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला.

दरम्यान, जॉर्ज ब्रुक्स यांनी भारतीय शास्त्रीय संगीत आणि पाश्चात्य संगीत 'जॅझ'चे विविध वाद्यांच्या माध्यमातून फ्यूजन सादर करून आपली कला सादर केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पायल शहा यांनी केले.

Web Title: marathi news indian classical music george brooks