नोकरीच्या आमिषाने डॉक्टर तरुणीवर बलात्कार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 फेब्रुवारी 2018

श्रीरामपूर - मानवाधिकार संघटनेचा पदाधिकारी असल्याचे सांगून डॉक्टर तरुणीला नोकरीचे आमिष देत वेळोवेळी बलात्कार केल्याप्रकरणी डॉ. विजय बाळासाहेब मकासरे याच्याविरुद्ध शिर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित तरुणी संगमनेर तालुक्यातील शेतकरी कुटूंबातील आहे. वडील वारल्यानंतर तिने आपले वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. चांगली नोकरी मिळाल्यास आई, बहिणीची काळजी घेता येईल, या अपेक्षेने ती नोकरीच्या शोधात होती. 

दरम्यान, डॉ. मकासरे याच्याशी तिची सोशल मीडियाद्वारे ओळख झाली. मकासरे याने तिच्याशी जवळीक वाढवली. मी मानवाधिकार संघटनेचा मोठा पदाधिकारी आहे. पदाधिकारी, अधिकाऱ्यांशी माझी चांगली ओळख आहे, मी तुला मोठ्या रुग्णालयात किंवा सरकारी दवाखान्यात नोकरीला लावतो, असे आमिष त्याने दिले. तरुणीच्या असह्यातेचा फायदा घेत त्याने शिर्डी येथील हॉटेल्समध्ये व शासकीय विश्रामगृह येथे नेऊन तिच्यावर बलात्कार केला. दुर्दैवाने आपली फसवणूक झाल्याचे तिच्या फार उशिराने लक्षात आले. त्यानंतर तिने संबंध तोडण्याचा प्रयत्न केला असता डॉ. मकासरे याने माझा घटस्फोट झाला आहे, मी तुझ्याशी लग्न करतो, नाहीतर आत्महत्या करीन, अशी धमकी दिली. तरीही ऐकण्याच्या मनस्थितीत नसलेल्या तरुणीने नकार दिल्यानंतर मला एकदा भेटण्याची संधी दे, असे म्हणत तिला बोलावून घेत मकासरे याने धमकावत आळंदी येथे नेऊन तिच्याशी बळजबरी लग्न केले व तिला पुन्हा तिच्या आईच्या घरी सोडले. दरम्यान या तरुणीचे नात्यातीलच एका डॉक्टरशी लग्न जमले होते. तिने घडलेला प्रकार आईला सांगितला. आईने नातेवाईकांना माहिती दिल्यानंतर लग्न मोडले. पीडित तरुणीने याप्रकरणी शिर्डी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी डॉ. मकासरे हा पसार आहे. 

Web Title: marathi news job bait girl rape doctor