अवजड वाहनांची "नो एन्ट्री' कागदावरच! 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018

कऱ्हाड - शहरातील मुख्य बाजारपेठेत येण्यास अवजड वाहनांना बंदी आहे. तरीही अवजड वाहने बिनधास्त फिरताना दिसतात. या वाहनांवर कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे अवजड वाहनांना "नो एन्ट्री' केवळ कागदावरच "स्ट्रॉंग' आहे. अवजड वाहनांमुळे बाजारपेठेला वाहतुकीच्या कोंडीला सामोरे जावे लागत आहे. कारवाईत होणारी कुचराई वाहतूक कोंडीचा प्रश्न जटिल करत आहे. 

कऱ्हाड - शहरातील मुख्य बाजारपेठेत येण्यास अवजड वाहनांना बंदी आहे. तरीही अवजड वाहने बिनधास्त फिरताना दिसतात. या वाहनांवर कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे अवजड वाहनांना "नो एन्ट्री' केवळ कागदावरच "स्ट्रॉंग' आहे. अवजड वाहनांमुळे बाजारपेठेला वाहतुकीच्या कोंडीला सामोरे जावे लागत आहे. कारवाईत होणारी कुचराई वाहतूक कोंडीचा प्रश्न जटिल करत आहे. 

कऱ्हाड शहरात मोठे व्यापारी, त्यांचे शोरूम व अनेक मोठ्या कंपन्यांची गोदामे आहेत. त्यात सगळ्यात महत्त्वाची बाजारपेठ दत्त चौकातून सुरू होते. दत्त चौक ते आझाद चौकातील व्यापाऱ्यांच्या मालाची नेहमीच ने-आण करणारी अनेक अवजड वाहने शहरात येतात. त्यातून होणारी वाहतुक कोंडी लक्षात घेऊन अशा वाहनांना शहरातील काही काळ मुख्य बाजारपेठेत वाहन आणण्यास बंदी आहे. पोलिसांनी दुपारी एक ते सायंकाळी चार यावेळेत व्यापाऱ्यांना अशी वाहने शहरात आणण्यास परवानगी दिली आहे. त्याशिवाय रात्री नऊनंतरही वाहने आणता येतील, असा पर्याय पोलिसांनी सुचवला होता. त्याच्या लेखी सूचना सर्वच व्यापाऱ्यांना दिल्या होत्या. किमान पाच ते सहा वर्षांपासून तो नियम लागू आहे. मात्र, अलीकडच्या काळात त्या नियमाला धाब्यावर बसवून व्यापाऱ्यांची अवजड वाहने बंदी असलेल्या वेळेत बाजारपेठेत दिसतात. 

शहराच्या मुख्य बाजारपेठेशिवाय पोळ गल्ली, मुळूक गल्ली, मुख्य पोस्टापासून आत जाणारा मार्ग व पुन्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याकडे जाणाऱ्या मार्गावरही बाजारपेठ विकसित होत आहे. मुख्य पोस्टापासून आत जाणाऱ्या मार्गावर होलसेल व्यापारी आहेत. त्या सगळ्या व्यापाऱ्यांची माल घेऊन येणारी अवजड वाहने नेमकी गर्दीच्या वेळी येतात. त्यामुळे त्या भागातही आता अवजड वाहनांमुळे वाहतुकीची कोंडी होते. पोलिसांनी सम-विषयमसह पार्किंगचा प्रश्न सोडवण्याबरोबरच अवजड वाहनांवर बंदीसाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. 

अवजड वाहनांच्या वेळा ठरवण्याची गरज 
कऱ्हाड शहरात दुपारी एकपर्यंत व त्यानंतर सायंकाळी चारनंतर अनेक वाहने रस्त्यावर असतात. कामावरून घरी जाणाऱ्या नोकरदारांसह शाळा सुटण्याच्या वेळी, तर शहरात वाहतुकीची मोठी कोंडी होते. शहरातील मुख्य बाजारपेठेत अनेक ठिकाणी ती कोंडी किमान पाऊणतास असल्याचे अनेकदा दिसून येते. त्याच भागात याच कालावधीत एखादे अवजड वाहन आल्यास मोठी कठीण स्थिती निर्माण होते. त्यामुळे अवजड वाहनांवर योग्य वेळ ठरवून देण्याची गरज आहे.

Web Title: marathi news karad heavy vehicle