अज्ञातांनी लावलेल्या आगीत लाखोंचे गवत जळून खाक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 फेब्रुवारी 2018

आगीचे वृत्त सगळीकडे पोहचल्यानंतर लोकांनी गर्दी केली. मात्र, कराड आणि शिराळा तालुक्यातील प्रशासनाने ताबडतोब कार्यवाही केली नाही.

उंडाळे (ता. कऱ्हाड) : सातारा आणि सांगली जिल्ह्याच्या हद्दीवर जिंती (ता. कराड ), पणुंब्रे (ता. शिराळा) या गावांच्या डोंगराला अज्ञातांनी लावलेल्या आगीत लाखोंचे गवत जळून खाक झाले. स्थानिक नागरिकांच्या प्रयत्नामुळे उर्वरित डोंगरावरील कापणी करून गवताच्या गंजी वाचवण्यात यश आले. 

पणुंब्रे शिराळा गावच्या हद्दीत डोंगराला आग लागली. आग लागल्याचे समजताच पणुंब्रे, गिरजावडे, जिंती, बोत्रेवाडी, शेवाळेवाडी या गावांमधील ग्रामस्थ आणि युवकांनी डोंगराकडे धाव घेऊन मिळेल, त्या साधनाने आग विझवण्याच्या प्रयत्न केला. दोन तासाच्या प्रयत्नानंतर ही आग विझवण्यात यश आले. मात्र, तोपर्यंत सुमारे शंभर एकरावरील कापणी करून ठेवलेल्या गवताच्या २० गंजी आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या.

आग आटोक्यात आल्याने सुमारे पाचशे एकरावरील गवत कापणी करून ठेवण्यात आलेल्या गंजी वाचवण्यात यश आले. त्यामुळे मोठी हानी टळली. या डोंगराजवळ असलेले वनीकरण वाचले. सदर वृत्त सोशल मीडियाव्दारे सगळीकडे पोहचल्याने मुंबई- पुण्यातील चाकरमान्यामध्येही चिंतेचे वातावरण होते. मात्र, आग आटोक्यात आल्याने त्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. 

Web Title: Marathi News Karad News Burning Agri Total burn