कऱ्हाड परिसरातील 22 मटकाचालक "सीमापार' 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 मार्च 2018

कऱ्हाड - शहर व परिसरात निरंतर मटक्‍याचा अड्डा चालणाऱ्या टोळीप्रमुखासह 22 जणांना एक वर्षांसाठी नऊ तालुक्‍यांतून हद्दपार केले आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी काल रात्री हे आदेश दिले. मटकाप्रकरणी दोनच दिवसांपूर्वी 14 जणांच्या टोळीला हद्दपार केले होते. त्यानंतर दुसरा दणका दिला आहे. पोलिस अधिनियम 1951 च्या कलम 55 अन्वये त्यांच्यावर कारवाई केली आहे. त्यांना सातारा जिल्ह्यातील कऱ्हाड, सातारा, पाटण, खटाव, माण, कोरेगाव व सांगली जिल्ह्यातील कडेगाव, वाळवा व शिराळा तालुक्‍यांत एक वर्ष न येण्याची बंदी आहे. 

संबंधितांवर वारंवार कारवाई होऊनही मटक्‍याच्या बुकी बंद करत नसल्याने पोलिस अधीक्षकांनी त्यांना हद्दपार केले आहे. त्यात दुसऱ्या टोळीप्रमुख उमेर मुजावर (वय 30, रा. सोमवार पेठ) याच्यासह बरकत मुजावर (वय 45, रा. मुजावर कॉलनी), वसंत भोंडे (45), प्रल्हाद माने (44, दोघे रा. चचेगाव), प्रकाश दुपटे (45, रा. कार्वे नाका), मधुकर साळुंखे (50, रा शिरवडे), रमशाद मलबारी (30, रा. मलकापूर), अनिल वारे (23, रा. बुधवार पेठ), रमेश सिंदगी (46, रा. बैलबझार रस्ता), समीर शेख (25), वसीम शेख (30), रियाज बुराण (38, तिघे रा. कार्वे नाका), नजीब मलबारी (44), साजीद मलबारी (33, दोघे रा. मलकापूर), गणेश भोसले (30), अनंत कांबळे (24, दोघे रा. बुधवार पेठ), कामेश नाटेकर (33, मार्केट यार्ड), महिंदु मलबारी (56, रा. शनिवार पेठ), सुनील पवार (51, रा. गोटे), ज्ञानेश्वर माने (34, रा. नांदलापूर), विजय माने (47, रा. सोमवार पेठ), प्रताप कवडे (65, रा. विरवडे) अशी तडीपार केलेल्यांची नावे आहेत.

Web Title: marathi news karad news crime