आकृतीबंधात ‘कही खुशी, कही गम...’

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 फेब्रुवारी 2018

कऱ्हाड - राज्यातील ३५९ नगरपालिका व नगरपंचायतींमधील राज्य संवर्ग सेवांतर्गत पदे निश्‍चित करताना लोकसंख्येच्या प्रमाणात राज्य शासनाने नव्याने सुधारित आकृतीबंधाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे २०११ च्या जनगणनेतील पालिकांच्या लोकसंख्येत अनेक पालिकांना राज्य संवर्गातील पदांमध्ये वाढ झाली असून काही पालिकांची पदे कमी झाली आहेत.

कऱ्हाड - राज्यातील ३५९ नगरपालिका व नगरपंचायतींमधील राज्य संवर्ग सेवांतर्गत पदे निश्‍चित करताना लोकसंख्येच्या प्रमाणात राज्य शासनाने नव्याने सुधारित आकृतीबंधाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे २०११ च्या जनगणनेतील पालिकांच्या लोकसंख्येत अनेक पालिकांना राज्य संवर्गातील पदांमध्ये वाढ झाली असून काही पालिकांची पदे कमी झाली आहेत.

पालिका व नगरपंचायतीच्या प्रशासकीय कार्यपद्धतीत गतिमानता व गुणात्मकता आणण्याबरोबरच विकासकामांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नगरविकास विभागाने २००६ पासून पालिकांसाठी सहा सेवांसाठी राज्य संवर्ग तयार केला. त्यावेळी दोन हजार ३७ पदांची निश्‍चिती करण्यात आली. त्यानंतर पुन्हा नव्याने स्थापन झालेल्या पालिका, नगरपंचायती तसेच काही पालिकेच्या वर्गवारीत झालेल्या बदलामुळे राज्य संवर्गातील मंजूर पदांची संख्या पाच हजार ९९५ निश्‍चित झाली. मात्र, लोकसंख्येच्या निकषावर मंजूर करण्यात आलेल्या सुधारित आकृतीबंधात ही संख्या कमी होऊन त्यात पाच हजार ५४५ पदांची निश्‍चिती झाली आहे. सुधारित आकृतीबंध मंजूर करताना पालिका व नगरपंचायतीच्या आस्थापनावरील यापूर्वीचा मंजूर असलेला आकृतीबंध कायम ठेवण्याचाही निर्णय शासनाने घेतला आहे.  

सुधारित आकृतीबंध...
दोन लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या ‘अ’ वर्ग पालिकांसाठी ४८ पदे निश्‍चित केली असून राज्यातील अवघ्या तीन पालिकांचा त्यात समावेश आहे. एक ते दोन लाख लोकसंख्या असलेल्या असलेल्या ‘अ’ वर्ग पालिकांसाठी ३८ पदे निश्‍चित असून (१४ पालिका), ७५ हजार ते एक लाख लोकसंख्या असलेल्या ‘ब’ वर्ग पालिकांसाठी ३० पदे (१५ पालिका), ७५ हजारांपेक्षा कमी  लोकसंख्या असलेल्या असलेल्या ‘ब’ वर्ग पालिकांसाठी २६ पदे (५८ पालिका), २५ हजार ते ३९ हजार ९९९ लोकसंख्या असलेल्या ‘क’ वर्ग पालिकांसाठी १५ पदे (८३ पालिका) निश्‍चित झाली आहेत. २५ हजारांपेक्षा कमी लोकसंख्येच्या ‘क’ वर्ग पालिकेसाठी १२ पदे निश्‍चित असून त्यात ६५ पालिकांचा समावेश आहे. दहा ते २४ हजार ९९९ लोकसंख्या असलेल्या नगरपंचायतींसाठी आठ पदांची निश्‍चिती केली असून त्यात ८० नगरपंचायतींचा समावेश आहे. दहा हजारांपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या नव्याने स्थापन झालेल्या नगरपंचायतींसाठी सहा पदे निश्‍चित असून ४१ नगरपंचायतींचा त्यामध्ये समावेश करण्यात आला आहे.

कऱ्हाडला लोकसंख्येच्या प्रमाणाचा फटका
राज्यातील ७५ हजार ते एक लाख लोकसंख्येच्या ‘ब’ वर्ग पालिकेतील राज्य संवर्गासाठी ३० पदांची निश्‍चिती करण्यात आली आहे. ७५ हजारांपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या पालिकांसाठी २६ पदे निश्‍चित केली आहे. या निकषांमुळे कऱ्हाडची ७४ हजार ३५५ लोकसंख्या असल्याने कऱ्हाड नगरपालिकेला २६ पदे निश्‍चित झाली आहेत. ७५ हजार लोकसंख्येच्या काठावर असल्याने केवळ तांत्रिक कारणास्तव कऱ्हाड पालिकेला चार पदांना मुकावे लागणार असून त्याचा फटका सोसावा लागणार आहे.

Web Title: marathi news karad news municipal post