जागेचा ताब्यावरुन फसवणूक; पंधरा जणांवर गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 फेब्रुवारी 2018

कऱ्हाड - खरेदी दस्त होऊनही जागेचा ताबा न दिल्याबद्दल माजी उपाध्यक्ष राजेंद्र यादव, बंधू विजय यादव व त्यांच्या कुटुंबासह मित्र परिवारातील 15 जणांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. अनुराधा दिलीप जाधव यांनी न्यायालयात त्याबाबत तक्रार दाखल केली होती. न्यायालयाकडून आलेल्या तक्रारीनुसार संबंधित 15 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. 

पोलिसांनी सांगितले की, राजेंद्र यादव, विजय यादव, संजय यादव, सिमा संजय यादव, रंजना राजेंद्र सनस, विलास रामचंद्र पवार, शारदा विलास पवार, नंदिनी विलास पवार, संदिप प्रलाद हुंबरे, अस्मिता संदिप हुंबरे, प्रीतम उत्तमराव यादव, गणेश उर्फ आशिष नरेंद्र आवळे, गणेश बाळू बेडके, माणिक भोपते व विजय मधुकर गद्रे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. येथील शनिवार पेठेतील 61 ब या मिळकतीतील 1500 चौरस फूट जागा राजेंद्र यादव नावावर करून देत नाहीत. त्यामुळे माझी सव्वा कोटींची फसवणूक झाली आहे. अशी तक्रार सौ. जाधव यांनी न्यायालयात दिली होती. त्यासंदर्भाने शहर पोलिसांत आज गुन्हा दाखल झाला. न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार वरील 15 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक प्रमोद जाधव यांनी दिली. 

सौ. जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये राजेंद्र यादव यांची जागा विकायची आहे. याची माहिती त्यांना विलास पवार यांनी दिली होती. त्याप्रमाणे त्यांनी नोंदणीकृत खरेदीदस्त केला. त्याची किंमत एक कोटी 25 लाख रुपये आहे. खरेदी दस्ताप्रमाणे राजेंद्र यादव यांना पैसे देण्यात आले आहेत. मात्र त्यांनी जागेचे मोजमाप करून देण्याचे मान्य केले होते. ते अद्यापही दिलेले नाही. त्याबाबत त्यांनी वारंवार शिवीगाळ करण्याचा प्रयत्न केला होता. त्याबाबत शहर पोलिसांतही तक्रारी दाखल आहेत. कऱ्हाडच्या सीटी सर्व्हे ऑफीसमध्ये गुन्हा नोंद होऊ नये या अनुंषंगाने प्रयत्न झाले. त्यामुळे फसवणूक झाली आहे, असे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे, असे पोलिसांनी सांगितले.

Web Title: marathi news karhad cheats police booked

टॅग्स