राधानगरी धरण लवकरच ओव्हर फ्लो; 97.56 टक्के भरले

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 30 जुलै 2017

राधानगरी : धरण पाणलोट क्षेत्रामध्ये गेल्या चोवीस तासात अतिवृष्टी झाल्याने राधानगरी धरणातील पाणीसाठ्यात कमालीची वाढ झाली आहे. आज सायंकाळी धरण 97.56 टक्के भरलेले असून, पाणी पातळी 346.44 फुटांपर्यंत पोचली आहे.

347.50 फुटांपर्यंत हे धरण पूर्ण भरते. आता धरण भरण्यासाठी एक फूट पाणी पातळी आणि दोनशे एमसीएफटी पाणीसाठा कमी आहे. त्यामुळे धरण पूर्ण भरून कोणत्याही क्षणी स्वयंचलित दरवाजे खुले होण्याच्या मार्गावर आहेत. पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत असल्याने धरणातून वीजनिर्मितीसाठी होणाऱ्या पाण्याच्या विसर्गात आठशे क्‍युसेसने वाढ केली आहे.

धरण पायथ्याशी असलेल्या दोनही वीजनिर्मिती केंद्रांतून पूर्ण क्षमतेने वीजनिर्मिती सुरू झाली आहे. सध्या प्रतिसेकंद 2200 क्‍युसेस पाणी वीजनिर्मितीसाठी सोडण्यात येत आहे. गेल्या चोवीस तासात धरण क्षेत्रात 143, तर पाणलोट क्षेत्रातील दाजीपुरात 181 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. दरम्यान, काळम्मावाडी धरण 77 टक्के भरले असून, पाणीसाठा 19.18 टीएमसी, तर तुळशी धरण 90 टक्के भरल्यामुळे त्यातील पाणीसाठा 3.12 टीएमसी झाला आहे. 

Web Title: marathi news kolhapur news Radhanagari Dam Monsoon