केंद्रीय मंत्री हेगडे यांच्या निषेधार्थ हुपरीत मोर्चा

बाळासाहेब कांबळे
शनिवार, 30 डिसेंबर 2017

हुपरी (कोल्हापूर) : केंद्रीय कौशल्य विकास मंत्री अनंत हेगडे यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ हुपरी येथे बौध्द समाजाच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला. 

हुपरी (कोल्हापूर) : केंद्रीय कौशल्य विकास मंत्री अनंत हेगडे यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ हुपरी येथे बौध्द समाजाच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला. 

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मोर्चाला सुरवात झाली. हुपरी पोलीस ठाण्यासमोर निषेध सभा झाली. यावेळी मंत्री अनंत हेगडे यांच्या वक्तव्याचा निषेध करणारी तसेच घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर व भारतीय संविधान यांचा गौरव करणारी भाषणे झाली. समाजभूषण मंगलराव माळगे, पंचायत समितीचे सदस्य किरण कांबळे, विद्याधर कांबळे, आनंदराव कांबळे, धर्मवीर कांबळे, नामदेव जाधव, प्रा. किरण भोसले, डॉ. स्वप्निल हुपरीकर, प्रा. विशाल कांबळे, दिलीप शिंगाडे, भरत माणकापुरे, हिरालाल कांबळे, चरणराज कांबळे, रविंद्र जत्राटकर, संतोष नरंदेकर, माधुरी कुरणे आदींची भाषणे झाली. 

सहाय्यक पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांना निवेदन देण्यात आले. मोर्चात नगरसेवक गणेश वाइंगडे, जयकुमार माळगे, बाळासाहेब मूधाळे , राजू साळोखे, भरत माणकापुरे, डॉ. सुभाष मधाळे, शशिकांत मधाळे, गुंडूराव कांबळे (यळगुड), बाळासाहेब वखारवाले, प्रदीप कांबळे, अविनाश कांबळे आदींसह लोक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 

 

Web Title: Marathi news kolhapur news rally against anant hegade