सरकारच्या निर्णयाविरोधात 'शिक्षण वाचवा नागरी कृती समिती'चा आंदोलनाचा इशारा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 फेब्रुवारी 2018

कमी पटसंख्येचे कारण सांगत शासनाने तेराशे शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील 34 शाळांचा त्यात समावेश असून, 4 शाळा कोल्हापूर शहरातील आहेत.

कोल्हापूर, ता. 3 : 'शिक्षण बचाओ, देश बचाओ' अशी घोषणा देत 'शिक्षण वाचवा नागरी कृती समिती'तर्फे राज्य शासनाविरूद्ध दसरा चौकात आंदोलन करण्यात आले. शासनाने राज्यातील तेराशे शाळा बंद करण्याचा निर्णय मागे घ्यावा. अन्यथा येत्या काही दिवसांत तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

कमी पटसंख्येचे कारण सांगत शासनाने तेराशे शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील 34 शाळांचा त्यात समावेश असून, 4 शाळा कोल्हापूर शहरातील आहेत. 23 शाळा दुर्गम भागातील, वाड्या-वस्त्यांवरील आहेत. या शाळा बंद केल्याने तेथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे शिक्षण बंद होणार आहे. याचा विरोध करण्यासाठी कृती समितीच्या आवाहनाला शहरातील विविध शाळांतील विद्यार्थी-विद्यार्थिनी, शिक्षक-शिक्षिका, विविध संघटनांचे प्रतिनिधी दसरा चौकात एकत्र झाले होते. 

राज्य शासनाचा धिक्कार करत छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा जयजयकार चौकात करण्यात आला. विद्यार्थिनींनी राज्य शासनाविरूद्ध रोखठोक भाषण करत शिक्षण वाचविण्यामागची भूमिका विशद केली. त्यानंतर त्यांनी प्रतिज्ञा घेतली.

Web Title: Marathi News Kolhapur News Warning about Agitation