वृद्धेवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला जन्मठेप

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 मार्च 2018

कोल्हापूर - भुदरगड तालुक्यातील नागणवाडी गावातील 90 वर्षीय वृद्ध महिला बलात्कार प्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयाने आज (१७ मार्च) आरोपीला जन्मठेपेची शिक्षा
 सुनावली. विष्णू कृष्णा नलवडे (५०) असे आरोपीचे नाव आहे. 

४ मार्च २०१५ रोजी घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली होती. या खटल्यामध्ये एकूण 9 साक्षीदारांची तपासणी करण्यात आली असून, सुनावणी दरम्यान पीडित महिला असहाय्य असल्याचे वकिलांनी म्हटले होते. तसेच ही महिली अंथरुणाला खिळून होती. सदरचा गुन्हा समाजाला धक्कादायक असाल्याचा युक्तिवाद सरकारी पक्षातर्फे करण्यात आला. अॅड. अमृता पाटोळे यांनी सरकारी पक्षातर्फे काम पाहिले.

Web Title: marathi news kolhapur news wester maharashtra rape case Life imprisonment