कोरेगाव भिमा घटनेच्या निषेधार्थ कडकडीत बंद 

चंद्रकांत देवकते
बुधवार, 3 जानेवारी 2018

मोहोळ जि. सोलापूर - भिमा कोरेगांव घटनेच्या निषेधार्थ येथील विविध दलित संघटनेच्या वतीने निषेध व्यक्त करीत संबंधितांवर मोक्का कायद्यातंर्गत कारवाई करण्याची मागणी काल (ता. २ जाने) रोजी दिलेल्या निवेदनात तहसीलदारांना व पोलिस निरीक्षकांना करण्यात आली होती.

त्या पार्श्वभुमीवर संपूर्ण महाराष्ट्र बंदला प्रतिसाद देत मोहोळ येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी केलेल्या बंदच्या आवाहनाला प्रतिसाद देत व्यापाऱ्यांनीही पाठींबा दिला व शंभर टक्के बंद पाळला. तत्पूर्वी सकाळी शेकडो युवकांनी शहराच्या मुख्य रस्त्याने प्रभातफेरी काढली होती. शहर व तालुक्यामध्ये कोठेही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. तर तहसीलदार बी. आर. माळी सर्व परिस्थितीवर लक्ष ठेऊन होते. 

Web Title: Marathi News Koregaon Bhima Kohol Protest