संभाजी भिडे आणि हाफीज सईद सारखेच.. : प्रकाश आंबेडकर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 13 जानेवारी 2018

कोल्हापूर : 'हिंदूंमधील 'हाफीज सईदां'चा सरकारने बंदोबस्त करावा; अन्यथा जनतेला त्यांचा बंदोबस्त करण्याचे आवाहन करण्याची वेळ येईल', असा इशारा भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आज (शनिवार) दिला. कोरेगाव भीमा प्रकरणात आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा भूमिका मांडली. हाफीज सईदवर जशी पाकिस्तानमध्ये कारवाई होत नाही, तसेच संभाजी भिडे यांच्यावरही कारवाई होत नाही, असे वक्तव्य आंबेडकर यांनी केले. 

अनियंत्रित हिंदू संघटना देश ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप आंबेडकर यांनी केला. आंबेडकर म्हणाले, "महाराष्ट्राला दुसऱ्यांदा आम्ही जातीय दंगलींपासून वाचवले. माझ्याबरोबर काम करणाऱ्यांनी जनतेला समजावून सांगितले. भारताचा पाकिस्तान होऊ नये, इतके सरकारने पाहावे. हाफीज सईद जसा पाकिस्तानमध्ये सत्ता ताब्यात घेऊ पाहत आहे, तसे इथे होऊ नये.'' 

कोरेगाव भीमा प्रकरणी 3 जानेवारी रोजी दंगल झाल्याचे आंबेडकर यांनी आज मान्य केले. हे मान्य करत असतानाच 'पोलिस कार्यकर्त्यांवर चुकीची कारवाई करत आहेत' असा दावाही त्यांनी केला. 'दलित संघटनांचा मी काल, आज आणि उद्याही 'राजा' असेन.. माझ्यापुढे इतर सगळे कागदी वाघ आहेत' असा टोलाही त्यांनी लगावला. कोरेगाव भीमा प्रकरणास शासनच जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी या पत्रकार परिषदेत केला. 

आंबेडकर म्हणाले... 

  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हिंदुत्त्ववाद्यांकडून धोका आहेच 
  • अनियंत्रित हिंदुत्त्ववादी संघटनांनी देशाचा ताबा घ्यायला सुरवात केली आहे. हे परवडणार आहे का, ठरवा! 
  • पोलिस खाते देशाशी प्रामाणिक नाही. त्यांच्यातीलच अनेक अधिकाऱ्यांनी मला सांगितले आहे. 
  • न्यायाधीशांनी जसे काल बोलून दाखविले, तसेच पोलिसांनीही करावे.
Web Title: marathi news Koregaon Bhima riots Pune Riots Sambhaji Bhide hafiz saeed Prakash Ambedkar