दंगलखोरांवर गुन्हे दाखल करा; शिवप्रतिष्ठानचा मोर्चा 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 जानेवारी 2018

सांगली - सांगली बंदच्या काळात मोर्चावेळी तोडफोड करणाऱ्यांवर तातडीने गुन्हे दाखल करावेत. यामध्ये झालेल्या नुकसानीची भरपाई दंगलखोरांकडून वसूल करावी, अशी मागणी आज शिवप्रतिष्ठानच्या वतीने जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील आणि जिल्हा पोलिस प्रमुख सोहेल शर्मा यांच्याकडे करण्यात आली. शिवप्रतिष्ठानच्या वतीने आज मोर्चा काढून संभाजी भिडे यांचे पोस्टर फाडल्याचा निषेध करण्यात आला. तसेच भिडे यांच्यावर आरोप करणाऱ्या प्रकाश आंबेडकर यांचा निषेध करण्यात आला. 

कोरेगाव भीमा येथील घटनेप्रकरणी दलित संघटनांच्या वतीने काल (ता. 3 जाने) बंद पुकारला होता. त्यावेळी मोटरसायकल रॅली काढण्यात आली होती. त्यावेळी काहींनी वाहनांवर तसेच दुकानांवर दगडफेक करुन नुकसान केले. गणपती मंदिराजवळच्या दुकानांची तोडफोड करुन लूट केली होती. आज शिवप्रतिष्ठानने मोर्चावेळी झालेल्या तोडफोड आणि लूट प्रकरणी मोर्चा काढला. मारुती चौकातून सकाळी अकरा वाजता शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने गोळा झाले. तेथून कडक बंदोबस्तात मोर्चा निघाला. मोर्चा सुरु झाल्यावर दुकानदारांनी दुकाने पटापट बंद केली. पण शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी त्यांना दुकाने उघडण्यास सांगितले. 'जय भवानी जय शिवाजी'च्या घोषणा देत मोर्चा जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आला. यावेळी प्रकाश आंबेडकरांच्या निषेधाच्या जोरदार घोषणा देण्यात आल्या. आंदोलकांचे निवेदन स्विकारण्यासाठी जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील, जिल्हा पोलिस प्रमुख सोहेल शर्मा उपस्थित होते. यावेळी बोलताना नितीन चौगुले यांनी संभाजी भिडेंच्या विरोधात जाणीवपूर्वक कट केला आहे. कोरेगाव भीमाची घटना निषेधार्थ आहे. ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी गुरुजी तेथे नव्हतेच. प्रकाश आंबेडकरांनी त्यांचे नाव जाणीवपूर्वक घेतले आहे. त्यांचा बोलावता धनी वेगळाच आहे. शिवप्रतिष्ठानमध्ये सर्व जाती-धर्माचे लोक आहेत. संबंधित महिलेने खोटी फिर्याद दिली आहे. 

यामध्ये सहभागी असणाऱ्यांची सखोल चौकशी होऊन त्यांना कडक शासन झाले पाहिजे. जिल्हाधिकारी काळम-पाटील म्हणाले, कायदा हातात घेणाऱ्या कोणाचीही गय केली जाणार नाही. पोलिस अधिक्षक शर्मा म्हणाले, या संपूर्ण घटनेच्या चौकशीसाठी एक समिती नियुक्त करण्यात अली आहे. ही समिती या संपूर्ण घटनेची सखोल चौकशी करण्यात येऊन दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल. पक्षपात ना करता दोषींवर नक्कीच कारवाई केली जाईल. यावेळी संभाजीराव भिडे अपर पोलिस अधिक्षक शशिकांत बोराटे, पोलिस निरीक्षक रवींद्र शेळके, शेखर माने, प्रसाद रिसवडे, उपमहापौर विजय घाटगे, त्रिगुण कुलकर्णी, नितीन चौगुले, अविनाश सावंत, अंकुश जाधव यांच्यासह अन्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Marathi News Koregaon Bhima ShivPratishthan Rally