आयुक्‍त शशिधर कुरेर यांच्याविरूध्द हक्‍कभंग प्रस्ताव मांडणार - आ. संजय पाटील 

Marathi News Letter of Breach of privilege against Commissioner Shashidhar Kurer Sanjay Patil
Marathi News Letter of Breach of privilege against Commissioner Shashidhar Kurer Sanjay Patil

बेळगाव - मुख्यमंत्री निधीतून मिळालेल्या शंभर कोटी रूपयांतून ग्रामीण मतदार संघात 9 कोटी रूपयांचे काम लक्ष्मी हेब्बाळकर, पालकमंत्री रमेश जारकीहोळी आणि आयुक्‍त शशिधर कुरेर यांनी सुरू केले आहे. हे काम करताना कोणतीही आचारसंहिता पाळण्यात आली असून आपण आमदार नसूनही जाणीवपूर्वक राजकारण करण्यात आले आहे. त्यामुळे या प्रकरणाविरोधात विधानसभेत हक्‍कभंगाचा प्रस्ताव मांडणार असल्याची माहिती आमदार संजय पाटील यांनी दिली. 

आमदार संजय पाटील यांनी आपल्या समर्थकांसह आज गुरूवारी (ता. 4) घोषणाबाजी महापालिकेला घातला. हेब्बाळकर, जारकीहोळी आणि कुरेर यांचा निषेध नोंदविला. 
आमदार पाटील म्हणाले, शंभर कोटी निधीच्या विनीमयासाठी शहरातील सर्व आमदार, पालकमंत्री, जिल्हाधिकारी आणि आयुक्‍त यांची संयुक्‍त समिती आहे. पण बेळगाव ग्रामीण मतदार संघात या निधीतून कामे करताना आपल्याला विश्‍वासात घेतले नाही. लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या सांगण्यावरुन पालकमंत्री जारकीहोळी आणि आयुक्‍त कुरेर यांनी 9 कोटी रूपयांचा निधी खर्च करण्याचा आणि त्याचे श्रेय हेब्बाळकर यांना देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. 

आचारसंहिता भंग करून हा प्रकार होत असून याविरोधात आम्ही गप्प बसणार नाही. काही दिवसांपासून हेब्बाळकर या सोशल मीडिया आणि वृत्तपत्रांत आपण 9 कोटी रूपये आणण्याचा दावा करत आहेत. त्या आमदार आणि खासदारकीच्या निवडणुकीत पराभूत झाल्या आहेत. त्यांच्याकडे सरकारमान्य कोणतेही पद नसताना केवळ राजकीय श्रेय लाटण्यासाठी असा प्रयत्न होत आहे, असे 
आमदार पाटील यांनी म्हटले आहे. पाटील यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी महापालिका आवारात दीड तास घोषणाबाजी करून घेराव घातला. प्रशांत जाधव, किरण पाटील, डॉ. विजय पाटील, मोहन पाटील आदी यावेळी उपस्थित होते. याचप्रकरणी नंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. 

आयुक्‍त कुरेर हे काँग्रेसचे एजंट असल्यासारखे वागत आहेत. 9 कोटी रूपयांच्या विकास कामांबाबत त्यांनी एकदाही मला विचारले नाही. माझा फोन उचलला नाही. त्यामुळे या निधीबाबत त्यांनी आणि पालकमंत्री जारकीहोळी यांनी आपली भूमिका स्पष्ट करावीय अन्यथा त्यांच्याविरोधात तीव्र आंदोलन हाती घेण्यात येईल, असा इशाराही आमदार संजय पाटील यांनी दिला. यावेळी त्यांनी आयुक्‍तांचा एकेरी उल्लेख केला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com