कर्जाचे आमिष दाखवून फसवणूक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 मार्च 2018

सोलापूर - कर्ज देण्याचे आमिष दाखवून बॅंकेत 2 लाख 47 हजार 350 रुपये भरण्यास लावून फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. साहेराबानू रिजवान शेख (वय 44, रा. टिळकनगर, मजरेवाडी, सोलापूर) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धनलक्ष्मी फायनान्स कंपनी तसेच संजना शर्मा, अनिलकुमार, समीर राणा, दीपक चव्हाण व आर. के. सिंघानिया यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी कंपनीकडून कर्ज मंजूर करतो म्हणून शेख यांच्याकडून वेळोवेळी बॅंकेत पैसे भरण्यास लावले. पैसे भरल्यानंतरही कर्ज मंजूर केले नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 

Web Title: marathi news loan Fraud crime