'मोक्का'अंतर्गत फरार गुन्हेगार अखेर जेरबंद

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 डिसेंबर 2017

अहमदनगर : मोक्का कायद्याअंतर्गत दाखल गुन्ह्यात दोन वर्षांपासून फरार असलेला आरोपी अंकुश रमेश जेधे याला नाशिक पोलिसांनी अखेर जेरबंद केले. त्याच्याकडून पिस्तुल, तीन जिवंत काडतुसे व दुचाकी जप्त करण्यात आली आहे. 

अहमदनगर : मोक्का कायद्याअंतर्गत दाखल गुन्ह्यात दोन वर्षांपासून फरार असलेला आरोपी अंकुश रमेश जेधे याला नाशिक पोलिसांनी अखेर जेरबंद केले. त्याच्याकडून पिस्तुल, तीन जिवंत काडतुसे व दुचाकी जप्त करण्यात आली आहे. 

नाशिक शहराचे सहाय्यक पोलिस आयुक्त गोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, काल ( ता. १६) रात्री इंदिरानगर पोलिस ठाणे हद्दीत गस्त सुरू असताना माऊलीनगर ते वासननगर रस्त्यावर आयसीआयसीआय बँकेजवळ दोन तरुण संशयितरित्या फिरताना आढळून आले. गस्त पथकाचे पोलिस उपनिरीक्षक रोहित शिंदे यांनी त्यांचा पाठलाग केला असता त्यांनीं दुचाकी जोराने पळवली. पुढे दुचाकी रस्त्यात सोडून पळ काढला. पोलिसांनी सुमारे एक किलोमीटर पाठलाग केल्यानंतर एका आरोपीला पकडण्यात यश आले. मात्र, दुसरा अारोपीने पळ काढला. 

पोलिस चौकशीत त्याने आपले नाव अंकुश जेधे असून, श्रीरामपूर येथील मोक्काअंतर्गत दाखल गुन्ह्यात दोन वर्षांपासून फरार असल्याचे सांगितले. तसेच सोबत असलेल्या तरुणाचे नाव नईम सय्यद असल्याचेही सांगितले. अंकुश हा सागर उर्फ चण्या बेग याचा नातेवाईक असल्याने तो नाशिक येथे कुणाकडे आला होता. तेथील इतर गुन्हेगारांशी त्याचा काही संबंध आहे का, याबाबत पोलिस अधिक तपास करत आहेत. दरम्यान, त्याला श्रीरामपूर येथे आज तपासासाठी आणण्यात आले.

Web Title: marathi news local crime mocca act criminal arrested