सोलापुरात पालकमंत्री-सहकारमंत्र्यांचे मनोमिलन नाहीच

विजयकुमार सोनवणे
शनिवार, 13 जानेवारी 2018

पालकमंत्री विजय देशमुख आणि सहकारमंत्री सुभाष देशमुख जेवणाच्या निमित्ताने एकत्रित आले. ते शेजारी बसून जेवणाचा आस्वाद घेतील व आपसातले वाद संपल्याचे संकेत देतील अशी अपेक्षा वर्तवण्यात येत असे. मात्र, संधी असूनही दोघानी शेजारी बसून जेवणाचे टाळले

सोलापूर : पालकमंत्री विजय देशमुख आणि सहकारमंत्री सुभाष देशमुख जेवणाच्या निमित्ताने एकत्रित आले. ते शेजारी बसून जेवणाचा आस्वाद घेतील व आपसातले वाद संपल्याचे संकेत देतील अशी अपेक्षा वर्तवण्यात येत असे. मात्र, संधी असूनही दोघानी शेजारी बसून जेवणाचे टाळले. एकाच पंगतीत बसूनही या दोघांनी अंतर कायम असल्याचे कृतीतून दाखवून दिले. त्यामुळे उपस्थितांची घोर निराशा झाली.

सिध्देश्वर यात्रेनिमित्त पालकमंत्र्यानी सर्व नगरसेवकांना जेवणाचे निमंत्रण दिले होते. त्यानुसार दोन्ही गटातील नगरसेवक आले. आपसातील वाद मिटल्याचे संकेतही त्यांनी दिले. आता हे दोन्ही मंत्री एकत्रित बसून जेवणाचा आस्वाद घेतील व सर्वांना सुखद धक्का देतील असे वाटत होते. मात्र, तसे घडलेच नाही. सभागृहात आल्यापासून ते बाहेर पडेपर्यंत या दोघांत दोन ते तीनवेळाच संवाद झाला. तोही मोजक्या शब्दात झाला. त्यामुळे कार्यकर्त्यांना अपेक्षित भाजप ऐक्याचे कमळ फुललेच नाही.

Web Title: marathi news local news solapur news guardian minister and subhash deshmukh lunch seperatly