विलासराव जगताप अपयशी आमदार : माजी आमदार शेंडगे

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 डिसेंबर 2017

सांगली : जतमध्ये लोकांनी भाजपला विकासासाठी संधी दिली होती, मात्र विलासराव जगताप अपयशी आमदार ठरले आहेत. मी तीन वर्षे त्यांना संधी देऊ, नाहक विरोध नको म्हणून बाजूला थांबलो होतो. ते काहीच करू शकणार नाहीत, हे सिद्ध झाल्याने आता मी आक्रमकपणे मैदानात उतरणार आहे, अशी गर्जना राष्ट्रवादीचे नेते आणि माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केली. 

जत विधानसभा निवडणुकीनंतर शेंडगे जतमधून गायब झाले होते. प्रचंड गाजलेल्या जत नगरपरिषद निवडणुकीत फिरकले नव्हते. त्याविषयी छेडले असता, त्यांनी ही भूमिका जाहीर केले. ते म्हणाले, "विधानसभा निवडणुकीत जनतेने भाजपला कौल दिला. जगताप आमदार झाले. त्यांना पहिल्या दिवसापासून विरोध करणे बरोबर नव्हते. कामाची संधी द्यायला हवी. ती तीन वर्षे दिली. या काळात म्हैसाळ उपसासिंचन या जिव्हाळ्याच्या प्रश्‍नाकडे साऱ्यांचे लक्ष होते, परंतु ही योजना एक इंचही पुढे सरकली. राज्यात आणि केंद्रात भाजपचेच सरकार असताना हे का होत नाही, याचे उत्तर त्यांनी दिले पाहिजे. पाण्याचा प्रश्‍न जशाच्या तसा राहिला आहे. त्यामुळे मी पुन्हा लक्ष घालणार आहे.'' 

ते म्हणाले, "जत नगरपरिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने सर्व जबाबदारी सुरेश शिंदे यांच्याकडे सोपवली होती. ते जत शहरातील नेते आहेत. त्यांचा तेथे प्रभाव मोठा आहे. अर्थात, तेथील प्रचार फलकांवर माझे फोटो होतेच. पक्षाने मला अन्यत्र निवडणुकांमध्ये स्टार प्रचारक म्हणून जबाबदारी दिली होती. आमदार जयंत पाटील स्वतः जतमध्ये लक्ष ठेवून होते. अशावेळी माझी भूमिका फार महत्वाची नव्हती. आता मात्र मतदार संघात लक्ष घालणार आहे.''

Web Title: marathi news local sangli news MLA vilasrao jagtap failure MLA says former MLA Shendge