सोलापूरातील माढ्यात दररोज ऐकू येणार राष्ट्रगीत!

किरण चव्हाण  
बुधवार, 24 जानेवारी 2018

माढा (सोलापूर) : माढा नगरपंचायत 26 जानेवारीपासून दररोज सकाळी दहा वाजून चाळीस मिनिटांनी संपूर्ण शहरात ध्वनीक्षेपकावरून सामूहिक राष्ट्रगीत घेणार असून नागरिकांमधे देशभक्तीची भावना अधिक रूजविण्यासाठी हा उपक्रम हाती घेतल्याचे माढयाचे नगराध्यक्ष राहूल लंकेश्वर व उपनगराध्यक्षा अॅड. मीनल साठे यांनी सांगितले. 

यावेळी श्री. लंकेश्वर व अॅड. साठे म्हणाल्या की, शहरात सार्वजनिकरीत्या राष्ट्रगीत गायले जावे व राष्ट्रभक्तीची भावना रूजावी या उद्देशाने हा उपक्रम राबवत आहोत. याबाबत शहरातील सर्व शाळांनाही कळविले आहे. नगरपंचायत कार्यालयातून ध्वनिक्षेपकावरून राष्ट्रगीत सुरू केले जाईल. त्याचा आवाज शहरात सर्वत्र पोहचणार आहे. त्यामुळे शहरात सर्वत्र एकाचवेळी राष्ट्रगीत ऐकावयास  मिळणार आहे. अशा पध्दतीचा उपक्रम राबविणारी माढा नगरपंचायत राज्यातील बहुधा पहिलीच नगरपंचायत असावी.

Web Title: Marathi news madha solapur news national anthem plays all over the city