कर्तृत्ववान महिला, युवतींचा होणार गौरव 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 मार्च 2018

सातारा - महिला दिनानिमित्त सकाळ मधुरांगणच्या वतीने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कर्तृत्वान महिला, युवतींचा गौरव केला जाणार आहे. त्या वेळी हास्यसम्राट कवी अशोक नायगावकर यांची "मिश्‍किली आणि कविता' ही हास्यमैफीलही होईल. येथील शाहू कलामंदिरात बुधवारी (ता. 7) दुपारी चार वाजता होणारा हा कार्यक्रम मधुरांगण सदस्यासह सर्व महिला व कुटुंबीयांसाठी खुला आहे. 

सकाळ मधुरांगणच्या वतीने महिलांच्या कलागुणांना नेहमीच वाव दिला जातो. अनेक महिला समाजात विविध क्षेत्रांत जिद्दीने मोठे काम उभे करतात. उद्योगासह सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक अशा विविध क्षेत्रांत महिला काम करत आहेत. अशा महिलांना त्यांच्या कार्यासाठी आणखी प्रोत्साहन मिळावे, यासाठी जिल्ह्यातील निवडक महिलांचा सत्कार केला जाणार आहे. त्या वेळी हास्यकवी अशोक नायगावकर यांची "मिश्‍किली आणि कविता' ही हास्याची मैफीलही आयोजित केली आहे. त्या वेळी श्री. नायगावकर हे विविध कविता, जीवनातील घटना, प्रसंगातून सहज घडणारे विनोद आपल्या सहज शैलीतून सादर करणार आहेत. त्यांच्या "मिश्‍किली'तून सर्वांना निखळ आनंद मिळणार आहे. 

या कार्यक्रमाचे सोने, चांदी हिऱ्यांच्या दागिन्यांसाठी महिलांत लोकप्रिय असलेली आणि विश्‍वसनीय पेढी चंदूकाका सराफ अँड सन्स प्रा. लिमिटेड हे मुख्य प्रायोजक आहेत. जिजाऊ प्रतिष्ठानच्या अध्यक्षा नगरसेविका सिद्धी पवार, "निरोगी कुटुंब-आनंदी कुटुंब' हे ध्येय बाळगणाऱ्या अपोलो डायग्नेस्टिक्‍सची सातारा शाखा आणि महिलांचे सौंदर्य व व्यक्तिमत्त्व विकासासाठी प्रशंसनीय योगदान देणाऱ्या इंप्रेशन ब्युटी क्‍लिनिक ऍड स्पाच्या स्वाती ओक या सहप्रयोजक आहेत. 

या आहेत सत्कारमूर्ती... 
- आर्याली चव्हाण (क्रीडा), तनिका शानभाग (साहसी क्रीडा), विद्या सुर्वे (सामाजिक), सुजाता सोनटक्के (स्कूल बसचालक), मृण्मयी जाधव (सर्प मैत्रीण), धनवंती कांबळे-लोकरे (शैक्षणिक)

Web Title: marathi news madhurangan satara women