मंगळवेढात ग्रामपंचायत निवडणूक निकाल  

हुकूम मुलाणी
बुधवार, 27 डिसेंबर 2017

मंगळवेढा - तालुक्यातील 19 ग्रामपंचायतीच्या निवडणूक निकालात आ भालके गटाने 11, आवताडे गटाने 12 व परिचारक गटाने 5 ग्रामपंचायती जिंकल्याचा दावा केला. पण बहुतांश ग्रामपंचायतीमध्ये गावपातळीवर आघाडी करुनच ग्रामपंचायतीवर सत्ता मिळाल्याचे निकालावरुन दिसून आले. पंचायत समितीच्या सभापतीच्या गावात सत्ता गमवण्याची परंपरा सभापती प्रदीप खांडेकर यांनी खंडीत केली.                            

काल (ता. 26 डिसें) तालुक्यात उत्फुर्तपणे मतदान झाले. आज (ता. 27 डिसें) सकाळी शासकीय गोदामात सकाळी 8.30 वाजता एकाच वेळी सर्व ग्रामपंचायतीच्या मतमोजणीस सुरवात झाली. निकाल ऐकण्यासाठी उमेदवारांचे समर्थक मोठया संख्येने उपस्थित होते. आंधळगाव येथे स्व. दत्ताजीराव भाकरे यांच्या पत्नी शांताबाई भाकरे या आवताडे गटाकडून विजयी झाल्या. हिवरगाव येथे सभापती प्रदीप खांडेकर तर चिक्कलगी येथे पक्षनेते नितीन पाटील यांच्या गटाची सत्ता कायम राहिली. निंबोणी येथे आ भालके समर्थक माजी संचालक ज्ञानेश्‍वर खांडेकर या गटाचा दारुण पराभव झाला. ब्रम्हपुरी येथे सर्जेराव पाटील गटांचे वर्चस्व कायम राहिले. तर जालीहाळ येथे नवख्या सचिन चौगुले यांनी आवताडे समर्थक बसवंत पाटील गटाचा पराभव करत सत्ता मिळविली. नंदूर येथे लक्ष्मी वाघमोडे व शिरसी येथील रेखा बळवंत या चिठ्ठीवर विजयी झाल्या. निकालानंतर विजयी उमेदवारांनी गुलालाची उधळण करत आपापल्या नेत्यांच्या कार्यालयास भेटी दिल्या. 

कृषी उदयोग संघात जिल्हा बँक संचालक बबनराव आवताडे यांनी त्यांच्या गटाचा तर आ भालके कार्यालयात उपनगराध्यक्ष चंद्रकांत घुले, दत्तात्रय भोसले, बसवराज पाटील यांनी आ भालके गटाच्या तर औदुंबर वाडदेकर यांनी आ परिचारक गटाच्या विजयी उमेदवार व सरपंचाचा सत्कार केला. निकाला दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून उपविभागीय पोलिस अधिकारी दिलीप जगदाळे, पोलिस निरीक्षक प्रभाकर मोरे यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांसमवेत राज्य राखीव दल, होमगार्डच्या मदतीने शासकीय गोदाम परीसर व निकाल झालेल्या गावात रात्री उशिरापर्यत पोलिस बंदोबस्त ठेवला होता. 

Web Title: Marathi News Mangalvedha Grampanchayat Elections Result