जीवघेणे ठरत आहेत ऊसाचे ओव्हरलोड ट्रक 

हुकूम मुलाणी
बुधवार, 24 जानेवारी 2018

मंगळवेढा : तालुक्यातील गाळपासाठी जात असलेली ओव्हरलोड ऊस रस्त्यावर पडत असून हा पडलेला ऊस शाळकरी विद्यार्थ्यांना धोकादायक ठरत आहे. तालुक्यातील दामाजी, युटोपियन, फेबटॅक, भैरवनाथ या चार साखर कारखान्याचा गाळप हंगाम जोमात सुरू असून गेल्या दोन तीन वर्षात दुष्काळी परिस्थितीमुळे ट्रॅक्टर मालकाचा अपेक्षित धंदा न झाल्यामुळे वाहनावर असणारे कर्ज तसेच राहिले. त्याच्या फेडीसाठी जादा व्यवसाय करण्यासाठी जादा ऊस भरुन वाहतूक केली जात आहे.

ऊसाच्या फडातून कारखान्याकडे ट्रॅक्टरच्या माध्यमातून ऊस वाहतूक सुरु असून ग्रामीण भागातील अरुंद रस्ते व खडडे चुकविताना ट्रॅक्टर चालकाला कसरत करावी लागत आहे. वाहनात तांत्रिक बिघाड झाल्यास वाहन रस्त्यात थांबल्याने रस्त्यांची कमी रुंदी व काटेरी झाडे यामुळे वाहतूक विस्कळीत होते. याबाबत सकाळने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर रस्त्यावरील खड्डे व झाडे तोडली. पण ओव्हरलोड ऊस रस्तावर पाण्याचे प्रमाण सुरूच आहे. मंगळवेढा ते ब्रम्हपुरी मार्गावरील ऊस वाहतूकीतील वाहनाला रिफ्लेक्टर नसल्यामुळे मागून धडकून अपघात होण्याचे प्रमाण वाढले. त्यात काही जखमी तर काही मृत्यूमुखी पडले. 

रात्रीच्या या वाहनांचा अंदाज येत नाही. रेडीयम असो अथवा रिफ्लेक्टर बसवविण्याकडे ना कारखान्याने लक्ष दिले ना पोलीस खात्याने आणखी किती जणांच्या बळीची वाट पाहणार असा सवाल विचारला जात आहे. तर भैरवनाथ कारखान्याकडे निंबोणीमार्गे जाणारी ऊसाच्या वाहनातील जादा झालेला ऊस रस्त्यावर पडत असून तो जनावराला चारा म्हणून देण्यासाठी व शाळेतील मुलांनी खाण्यासाठी आपला जीव धोक्यात घातला जात आहे. विद्यार्थीच्या या कृत्याकडे शाळेचेही लक्ष नाही.

Web Title: Marathi news mangalwedha news overloaded sugarcane trucks