महिला दिनानिमित्त मंगळवेढा पोलिस ठाण्याचा कारभार  महिला पाेलीसांच्या हाती

दावल इनामदार
शुक्रवार, 9 मार्च 2018

ब्रह्मपुरी (सोलापूर) : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधुन मंगळवेढा पोलिस ठाण्याचा कारभार पोलिस निरीक्षक प्रभाकर मोरे यांनी गुरूवारी सकाळी आठ वाजता महिला पोलिस कर्मचार्‍यांच्या हाती दिला. गुरूवारी दिवसभरामधे पोलिस हवालदार ते पोलिस शिपाई पर्यंतच्या सर्व महिलांनी कामकाज यशस्वीरित्या पार पाढुन ' हम भी कुछ कम नहीं' हे दाखवून दिले. 

ब्रह्मपुरी (सोलापूर) : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधुन मंगळवेढा पोलिस ठाण्याचा कारभार पोलिस निरीक्षक प्रभाकर मोरे यांनी गुरूवारी सकाळी आठ वाजता महिला पोलिस कर्मचार्‍यांच्या हाती दिला. गुरूवारी दिवसभरामधे पोलिस हवालदार ते पोलिस शिपाई पर्यंतच्या सर्व महिलांनी कामकाज यशस्वीरित्या पार पाढुन ' हम भी कुछ कम नहीं' हे दाखवून दिले. 

दि.8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जात असून याच पार्श्वभुमीवर मंगळवेढयाचे पोलिस निरीक्षक प्रभाकर मोरे यांनी या दिवशी महिलांना पोलिस ठाण्याच्या कारभार करण्याची संधी दिली. पोलिस नाईक वंदना धोंडीबा आयरे यांनी सकाळी 8 ते रात्री 8 यावेळेत जबाबदारीने ठाणे अंमलदारची भूमिका बजावली. तर पोलिस शिपाई वर्षा बंडगर यांनी संगणक मदतनिस, वायरलेस ऑपरेटर म्हणून पोलिस शिपाई रूपाली रेठेकर, बारनिशी कामकाज पोलिस शिपाई रूपाली दौंडे, पोलिस नाईक मोनाली वाघे यांनी वाहतुक शाखा, पोलिस कॉन्स्टेबल ज्योती आरदाळकर, सोनाली सावंत, पुनम खोराटे आदि महिला पोलिस कर्मचार्‍यांनी मोठया उत्साहाने आनंदोत्सवात दिवसभर पोलिस ठाण्याचे कामकाज यशस्वीरित्या पार पाडले.

रात्री 8 ते सकाळी 8 पर्यंत ठाणे अंमलदार म्हणून मोनिका वाघे, संगणक मदतनिस म्हणून सोनाली सावंत व इतर महिला पोलिस कर्मचारी सेवा बजविणार असून या 24 तासा मधे महिलांच्या हाती पोलिस ठाण्याच्या कामकाज देऊन एक प्रकारचा आत्मविश्वास वाढउन महिला पोलिसाचा संदेश आदर्श ठरणार आहे आजच्या दिवसामधे पोलिस ठाण्यात ठाणे अंमलदारपासून ते सर्व टेबलला महिला वर्गच दिसत असल्यामुळे हे दृश्य पाहून येणारे नागरिक अचंबित होत असल्याचे चित्र होते. मंगलवेढा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रभाकर मोरे व पोलिस कर्मचाऱ्यानी महिला पोलिसांना सत्कार करुण शुभेच्छा देण्यात आल्या. पोलिस ठाण्यामध्ये आज  सकाळी कार्यभार स्विकारताना  ठाणे अंमलदार व सर्व पदावरील महिला पोलिस कर्मचाऱ्यानी  आज  हसत चेहर्‍याने आजचे दिवसभराचे कामकाज पार पाडले हे महिलांच्या दृष्टीने नवलच म्हणावे लागेल. आज सकाळ पासून मी सर्व कामाची जबाबदारी पूर्ण करुण आजचा दिवसाच्या कामामधे उत्साह वाढून आत्मविश्वास वाढविला गेला आम्ही महिलापोलीसाने दिवस भराचे कामकाज सक्षमपणे पार पाडली याचा आम्हाला आनंद होत आहे, अशी भावना ठाणे अंमलदार वंदना आयरे यांनी व्यक्त केली. 

Web Title: Marathi news mangalwedha news womens day lady police