नायब तहसीलदारांसह लिपिकेला नोटीस 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 16 जुलै 2017

कोल्हापूर : करवीर आणि दक्षिण मतदारसंघात 500 हून अधिक बोगस मतदारांची नोंद केल्याचे प्रांतांच्या लक्षात आल्यानंतर ही नावे ऑनलाईनमधून डिलीट केली होती. हे प्रकरण "सकाळ'ने शनिवारी (ता. 8) उजेडात आणल्यानंतर दोन्ही मतदारसंघांत खळबळ उडाली. शिंगणापूर व मोरेवाडी (ता. करवीर)मध्ये पाचशेहून अधिक परस्पर नावे नोंद झालीच कशी, याबाबत तहसीलदार उत्तम दिघे यांनी नायब तहसीलदार व महिला लिपिकास कारणे दाखवा नोटीस बजावली. तसेच तीन दिवसांत खुलासा करण्याचे आदेश तहसीलदार उत्तम दिघे यांनी दिले. 

करवीर व दक्षिण मतदारसंघात असणाऱ्या शिंगणापूर व मोरेवाडीसारख्या गावांतील केंद्रांतून तलाठ्यांनी 8 ते 10 मतदार नोंदणी अर्ज आले असताना प्रत्यक्षात मात्र दोन्ही मतदान केंद्रांवरून तब्बल 500 हून अधिक अर्जांची डाटा ऑपरेटरनी नोंदणी केली होती. जिल्ह्यात आधीच बोगस मतदारांची नोंदणी होत असल्याच्या तक्रारी होत होत्या.

दरम्यान, शिंगणापूर व मोरेवाडीत मात्र मतदारांची नावे घुसडली होती. मात्र, तोंडी सूचना देण्यापुरतीच ही कारवाई झाली होती. त्यामुळे चुका करणारे अधिकारी, कर्मचारी आणि डाटा ऑपरेटर्स मोकाट होते. दरम्यान, "सकाळ'ने हे प्रकरण उजेडात आणल्यानंतर निवडणूक अधिकारी व जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी याची चौकशी करण्याच्या सूचना करवीर प्रांताधिकारी सचिन इथापे यांना दिल्या होत्या. त्यानुसार करवीर तहसीलदार दिघे यांनी नायब तहसीलदार व लिपिकास कारणे दाखवा नोटीस बजावली.

Web Title: marathi news marathi website kolhapur news fraud voters