कुंभार समाजासमोर जीएसटीचे "विघ्न' 

अमर पाटील
रविवार, 13 ऑगस्ट 2017

बांबवडे : कुंभार समाजाचा पारंपरिक गणेश मूर्ती कारागिरीचा व्यवसाय जीएसटीमुळे अडचणीत आला आहे. असे असले तरी गणेश मूर्तींच्या तयारीला वेग आला आहे.

शाहूवाडी तालुक्‍यात बांबवडे, सोनवडे, डोणोली, कापशी परिसरात मूर्ती तयार केल्या जातात. पारंपरिक व्यवसायास आधुनिकतेची जोड देत शहरातील मूर्तींच्या स्पर्धेत ग्रामीण भागातील गणेश मूर्तिकार सुबक मूर्ती साकारतात. ग्रामीण भागात मूर्तींचे भाव जेमतेम ठेवावे लागतात. त्यामुळे या मूर्तिकारांना म्हणावा तसा फायदा होत नाही. त्यातच जीएसटी कायद्यामुळे हा व्यवसाय आणखीनच अडचणीत आला आहे. 

जीएसटीनुसार प्लास्टर ऑफ पॅरिसवर 18 टक्के, रंग व साहित्यावर 28 टक्के जीएसटी आकारल्याने मूर्तीच्या किमती अव्वाच्या सवा वाढल्या आहेत. त्यामुळे मोठ्या मूर्तींऐवजी लहान व परवडणाऱ्या दरात मूर्ती घेण्याकडे भक्तांचा कल वाढत आहे. परिणामी मोठ्या मूर्तींची मागणी घटल्याने मूर्तिकारांनाही आर्थिक फटका बसत आहे. 

ग्रामीण भागात कौशल्य असणारा कामगारवर्ग मिळत नाही. त्यामुळे जसे कामगार मिळतील तसे काम करावे लागते. कामगारांवर जेवण, चहा, नाश्‍ता यांबरोबरच वैद्यकीय खर्चही मालकाला करावा लागतो. वाढत्या महागाईमुळे व अपुऱ्या साधनांमुळे मूर्ती कारागिरी व्यावसायिक आगोदरच हतबल झाले असताना, आता जीएसटीमुळे त्यांना नफा होण्याऐवजी तोटाच सहन करावा लागत असल्याचे समाजातील जाणकारांनी सांगितले. 

कुंभार समाज आर्थिक स्तरावर नाही. व्यवसायही हंगामी असल्याने बॅंकाही कर्ज देत नाहीत. त्यामुळे खासगी सावकारांकडून कर्ज घेऊनच व्यवसाय करावा लागतो. बॅंकांनी अल्प कालावधीसाठी कर्जपुरवठा करावा. जीएसटीच्या अटीतून या समाजाला वगळावे. 
- धनंजय कुंभार मूर्ती कारागीर, सोनवडे-बांबवडे

Web Title: marathi news marathi website Kolhapur News GST Ganeshotsav