''सत्ताधाऱ्यांनी संस्थेच्या नावाचा गैरवापर केला''

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 ऑगस्ट 2017

कोल्हापूर : 'मुस्लिम बोर्डिंगचे संचालक केवळ खुर्चीला चिकटून राहिले आहेत. मुस्लिम समाजासाठी ठोस असे काहीही केले नाही. संस्थेच्या नावाचा गैरवापर करून समाजाचे नेते म्हणवून घेण्यात धन्यता मानली,' असा आरोप विरोधी गटातर्फे आयोजित सभासदांच्या मेळाव्यात करण्यात आला. आयर्विन ख्रिश्‍चन हायस्कूलच्या सभागृहात हा मेळावा झाला. 

2007-2008 नंतर वार्षिक सभा न घेताच सत्तारूढ संचालक बेकायदेशीरपणे सत्तेवर आहेत. संस्था बळकाविण्याचा प्रकार हाणून पाडण्यासाठी न्यायालयात दाद मागून निवडणुकीचे आदेश मिळविण्यात आले. त्यानुसार त्रैवार्षिक निवडणूक होत आहे. गेली दहा वर्षे खुर्चीला चिकटूनही संचालकांना विधायक कार्यक्रम राबविता आला नाही. समाजाचे नेते म्हणवून घेण्यात धन्यता मानली व आपलाच फायदा करून घेतला, असा आरोप वक्‍त्यांनी केला. प्रत्येक तालुक्‍यालाही प्रतिनिधित्व देण्याची मागणी सभासदांनी केली. संचालक आदिल फरास यांनी निवडणूक बिनविरोध करण्याची मागणी केली; मात्र सभासदांनी नकार देत एकाही विद्यमान संचालकांला संधी न देण्याची भूमिका घेतली. 

हाशम मनगोळी, मुहमंद चौधरी, झाकीर कुरणे, शौकत मुजावर, यासीन बागवान, महेबूब सनदी, ऍड. मुनाफ मणेर, तौफिक मुल्लाणी, रियाज सुभेदार, के. एम. बागवान, सलीम मुल्ला, इरफान हारूगले, लिली गोलंदाज, इकबाल देसाई, अख्तर इनानदार, रियाज बागवान, मुसा बागवान, ऍड. हजारे आदी उपस्थित होते. 

सत्तारूढ गटाचे षड्‌यंत्र 
एमआयएमचे लोक मेळाव्यास येणार असल्याची खोटी बातमी देऊन काही लोकांना पाठविण्यामागे सत्तारूढ संचालकांचे षड्‌यंत्र असल्याचा आरोप विरोधी गटाने केला आहे. आपल्या विरोधात समाज एकत्रित येत आहे, हे पाहून समाजात तेढ निर्माण करणारी अफवा पसरविल्याचे गटाने म्हटले आहे.

Web Title: marathi news marathi website Kolhapur News Muslim Boarding