नृसिंहवाडीला दुर्मिळ योग साधत नारळी पौर्णिमा 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 ऑगस्ट 2017

नृसिंहवाडी : श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे श्री कन्यागत महापर्वकाळ, चंद्रग्रहण व श्रावण सोमवार अशा दुर्मिळ योगांवर आलेला नारळी पौर्णिमा उत्सव कृष्णेला नारळ अर्पण करून साजरी झाली. यावेळी भाविकांची तीर्थक्षेत्रावर गर्दी होती. यावेळी अनेकांनी ग्रहणनिमित्त कृष्णा नदीपात्रात स्नान केले. 

नृसिंहवाडी : श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे श्री कन्यागत महापर्वकाळ, चंद्रग्रहण व श्रावण सोमवार अशा दुर्मिळ योगांवर आलेला नारळी पौर्णिमा उत्सव कृष्णेला नारळ अर्पण करून साजरी झाली. यावेळी भाविकांची तीर्थक्षेत्रावर गर्दी होती. यावेळी अनेकांनी ग्रहणनिमित्त कृष्णा नदीपात्रात स्नान केले. 

श्री कन्यागतपर्वकाळ समाप्ती महिन्याच्या पार्श्‍वभूमीवर श्री दत्त तीर्थक्षेत्रावर साप्ताहिक सुट्टीस जोडून दोन दिवस भाविकांची गर्दी होती. पहाटे श्री दत्त मंदिरात काकड आरती व प्रात:कालीन पूजा झाली. सकाळी आठ ते बारा या वेळेत भाविकांसाठी मंदिरात पंचामृत अभिषेक मोठ्या भक्तीभावाने झाला. महापूजेवेळी अनेक भक्तांनी मोठ्या संख्येने येथे हजेरी लावली. 

दुपारी तीन ते चार या वेळेत पवमान पंचसुक्त पठण झाले. रात्री उशिरा धुप दीप आरती इंदूकोटी आदी कार्यक्रम संपन्न झाले. दिवसभरात श्रीच्या दर्शनासाठी दत्त देवस्थानने तीन स्वतंत्र रांगा केल्या होत्या. कृष्णेस नारळ अर्पण करताना भाविकांना धोका होवू नये, यासाठी पात्रामध्ये रिंगा, रोप, लाईफ जॅकेट, यांत्रिक बोटी नावा, पट्टीचे पोहणारे, वजीर रेसक्‍यू फोर्स (औरवाड) आदी यंत्रणा तैनात केली होती. 

गर्दीच्या पार्श्‍वभूमीवर क्‍लोज सर्किट टीव्हीचे नियोजन केले होते. नारळ व मिठाई उत्पादकांची यामुळे उलाढाल मोठी झाली. भाविकांसाठी दत्त देवस्थान अध्यक्ष राजेश खोंबारे, सर्व विश्‍वस्त यांच्या पुढाकाराने सभामंडप, दर्शन रांगा, महाप्रसाद, पिण्याचे पाणी यांचे नियोजन केले. सरंपच अरूंधती जगदाळे यांनी ग्रामपंचायतीतर्फे पार्किंग, आरोग्य, दिवाबत्ती, स्वच्छता यांचे नेटके नियोजन केले. गर्दीच्या पार्श्‍वभूमीवर कुरूंदवाड, जयसिंगपूर, इचलकरंजी, मिरज या आगारांनी जादा गाड्या सोडल्या होत्या. नृसिंहवाडी दूरक्षेत्र व शिरोळ पोलिस ठाण्यांतर्फे भाविकांसाठी सुरक्षा व्यवस्था ठेवली. 

Web Title: marathi news marathi website Kolhapur News nrusinhawadi narsobawadi