संगमनेर : विहिरीत उडी मारून मनोरुग्ण महिलेची आत्महत्या

हरिभाऊ दिघे
शनिवार, 4 नोव्हेंबर 2017

तळेगाव दिघे ( जि. नगर ) : एका मनोरुग्ण महिलेने वेडाच्या भरात विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. नंदा संपत रहाणे ( वय ४३ ) असे तिचे नाव आहे. शुक्रवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी शिवारात ही घटना उघडकीस आली.

चंदनापुरी येथील रहिवाशी नंदा रहाणे ही मनोरुग्ण असल्याने तिच्यावर उपचार सुरु होते. गुरुवारी रात्रीपासून ती बेपत्ता होती. शुक्रवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास त्यांच्याच मालकीच्या शेतातील विहिरीत तिचा मृतदेह आढळून आला. याबाबत पोलिसांना कळविण्यात आले.

सहाय्यक फौजदार एम. बी. खान यांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी संगमनेर येथे हलविला. वसंत एकनाथ खर्डे ( रा. रायते ता. संगमनेर ) यांनी खबर दिली. त्यानुसार संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलीस निरीक्षक गोकुळ औताडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार एम. बी. खान अधिक तपास करीत आहे.

Web Title: marathi news marathi websites Ahmednagar News Western Maharashtra