बेळगावमध्ये नगरसेविकेच्या घराची भिंत कोसळली

मल्लिकार्जुन मुगळी
शुक्रवार, 1 सप्टेंबर 2017

बेळगाव : बेळगावच्या नगरसेविका मिनाक्षी चिगरे यांच्या घराची भिंत शुक्रवारी पहाटे पाच वाजता कोसळली.

शिवाजीनगर येथील दुसऱ्या गल्लीत चिगरे यांचे घर आहे. चिगरे कुटुंबातील सर्व सदस्य गाढ झोपेत असताना पहाटे पाच वाजता घराची एका बाजूची संपूर्ण भिंत कोसळली. या घटनेते चिगरे कुटुंबियांपैकी कोणालाही दुखापत झाली नाही. पण यामुळे त्यांचे सुमारे पाच लाख रूपयांचे नुकसान झाले आहे.

चिगरे यांच्या घरात गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे, या दुर्घटनेत गणेशमूर्तीला कोणताही धक्का लागलेला नाही.

भिंत कोसळल्यामुळे चिगरे यांच्या घरातील टीव्ही, फ्रीज, तिजोरी व अन्य प्रापंचिक साहित्याचे नुकसान झाले आहे. चिगरे या प्रभाग 48 च्या नगरसेविका आहेत.

शिवाजीनगर येथील दुसऱ्या गल्लीत त्यांचे घर आहे. ते घर जुने आहे, गेल्या चार दिवसापूर्वी झालेल्या जोरदार पावसात घराची एका बाजूची भिंत भिजली होती. पण ती भिंत कोसळेल असे चिगरे कुटुंबियाना वाटले नव्हते. पण शुक्रवारी पहाटे पाच वाजता अचानक भिंत कोसळली. यावेळी जोरदार आवाज झाल्यामुळे चिगरे कुटुंबातील सदस्य घाबरून ताबतोब बाहेर आले. यावेळी शेजारील लोकही जागे होऊन गल्लीत जमा झाले. चिगरे यानी या घटनेची माहिती तहसिलदार कार्यालय व मार्केट पोलिसाना दिली आहे.

Web Title: marathi news marathi websites Belgaum News Kolhapur News